अखेर उदय भाईला...; नाना पाटेकर यांच्या लेकानं कतरिना-विकीला दिल्या हटके शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 04:37 PM2021-12-10T16:37:38+5:302021-12-10T19:13:55+5:30
Katrina Kaif Vicky Kaushal wedding : ख-या आयुष्यात कतरिना विकी कौशलची होताच, मल्हारने एक मजेदार पोस्ट करत, नवदांम्पत्याला शुभेच्छा दिल्यात.
कतरिना कैफ (Katrina Kaif) अखेर मिसेस कौशिक झाली. होय, काल कतरिनाने अभिनेता विकी कौशलसोबत (Vicky Kaushal ) लग्नगाठ बांधली. या लग्नाचे फोटो स्वत: जोडप्यानं सोशल मीडियावर शेअर केलेत आणि चाहत्यांना एकच आनंद झाला. चाहत्यांनी शुभेच्छांचा एकच वर्षाव केला. सेलिब्रिटींनी नव्या जोडप्याला भरभरून शुभेच्छा दिल्यात. अभिनेते नाना पाटेकर यांचा मुलगा मल्हार पाटेकर (Nana Patekar son Malhar Patekar) याने विकी व कॅटला अशा काही हटके शुभेच्छा दिल्यात की, त्याची चर्चा झाली नसेल तर नवल.
ख-या आयुष्यात कतरिना विकी कौशलची होताच, मल्हारने एक मजेदार पोस्ट करत, नवदांम्पत्याला शुभेच्छा दिल्यात. ‘वेलकम’ या चित्रपटातील एका सीनचा स्क्रीनशॉट पोस्ट करत, ‘शेवटी उदय भाईला त्याच्या बहिणीसाठी योग्य वर मिळालाच... शुभेच्छा विकी...’, अशी पोस्ट मल्हारने शेअर केली आणि ती क्षणात व्हायरल झाली.
तुम्हाला आठवत असेलच की ‘वेलकम’ या चित्रपटात मल्हारचे बाबा म्हणजे नाना पाटेकर व कतरिना कैफ यांनी सोबत काम केलं होतं. या चित्रपटातून कतरिनाने नाना पाटेकर बहिणीची भूमिका साकारली होती. आपल्या बहिणीसाठी योग्य नवरा मुलगा शोधण्यासाठी डॉन उदय शेट्टी (नाना पाटेकर यांनी साकारलेली व्यक्तिरेखा)नेमका काय खटाटोप करतो हे चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. मल्हारने हाच संदर्भ जोडत विकी व कॅटला शुभेच्छा दिल्यात.
नाना यांना मल्हार नावाचा एक मुलगा आहे. मल्हारशिवाय देखील नानाला एक मुलगा होता. पण दुर्दैवाने जन्मानंतर काही दिवसांच्या अंतराने त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर मल्हारचा जन्म झाला. आई-वडिल कलाक्षेत्राशी संबधित असूनही मल्हार मात्र लाईम लाईटपासून काहीसा लांबच असतो.