कतरिना कैफचा भाऊ ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीवर झाला फिदा; म्हणाला, Pretty Cool
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 14:03 IST2021-12-13T13:59:38+5:302021-12-13T14:03:28+5:30
Katrina Kaif and Vicky Kaushal : कतरिनाचा भाऊ आणि विकीचा मेहुणा Sebastien Laurent Michel ने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बहिणीच्या मेंहदी सेरेमनीचा एक खास फोटो शेअर केला आहे आणि या खास फोटोतील एका खास चेहऱ्याने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे.

कतरिना कैफचा भाऊ ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीवर झाला फिदा; म्हणाला, Pretty Cool
कतरिना कैफ (Katrina Kaif) व विकी कौशल (Vicky Kaushal) हे नवविवाहित दांम्पत्य सध्या आपल्या शाही लग्नाचे फोटो शेअर करण्यात बिझी आहे. होय, लग्नानंतर विकर व कॅट दोघांनीही लग्नाचे एकापेक्षा एक सुंदर फोटो शेअर केलेत. कतरिनाच्या भावंडांनीही या लग्नाचे फोटो शेअर करण्याचा धडाका लावला आहे.
कतरिना मोठी स्टार आहे. पण तिची भावंड कायम लाईटलाईटपासून दूर राहतात. पण बहिणीच्या लग्नामुळे ही भावंड जाम चर्चेत आहे. सर्वाधिक चर्चा आहे ती कतरिनाचा भाऊ आणि विकीचा मेहुणा Sebastien Laurent Michel याची. होय,सेबॅस्टियनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून बहिणीच्या मेंहदी सेरेमनीचा एक खास फोटो शेअर केला आहे. होय, या खास फोटोतील एका खास चेहऱ्याने तूर्तास सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे. हा चेहरा दुसऱ्या कुणाचा नाही तर एका अभिनेत्रीचा आहे आणि सेबॅस्टियन या चेहऱ्यावर कदाचित चांगलाच भाळला आहे.
सेबॅस्टियनने शेअर केलेल्या फोटोत कतरिनासोबत तिच्या दोन बहिणी आहे आणि तिसरी आहे ती अभिनेत्री शर्वरी वाघ (Sharwari Wagh).
‘माझं खरोखरच सुंदर कुटुंब आहे, फक्त बाहेरून नाही तर आतूनही सुंदर आहे. मी गेल्या जन्मात काही पुण्य केले असणार म्हणून मला हे कुटुंब मिळालं असणार आणि हो, शर्वरी खूप सुंदर आणि कूल आहे,’ असं सेबॅस्टियनने या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
आता शर्वरी जोशी कोण, हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. ‘बंटी और बबली 2’मध्ये ती बबलीच्या भूमिकेत दिसली होती. शर्वरी ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. शर्वरीची आई नम्रता वाघ ही मनोहर जोशी यांनी मुलगी आहे. शर्वरीच्या वडिलांचे नाव शैलेश वाघ असून ते प्रसिद्ध उद्योगपती आहेत. तर तिची आई नम्रता आर्किटेक्ट आहे.
शर्वरीने 16 व्या वर्षी मॉडेलिंग करायला सुरुवात केली. 2013 मध्ये कॉलेजमध्ये असताना तिनं क्लीन अँड क्लिअर फ्रेश फेस स्पर्धा जिंकली होती. प्यार का पंचनामा 2, बाजीराव मस्तानी, सोनू के टीटू की स्वीटी या सिनेमांसाठी शर्वरीने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं आहे.