विक्की कौशल आणि कॅटरिना कैफ दिसणार एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 11:44 AM2019-05-04T11:44:16+5:302019-05-04T11:49:18+5:30
उरी सिनेमातून आपला दमदार अभिनयाची झलक दाखवत फॅन्सच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली. विक्की आणि कॅट लवकरच एकत्र दिसू शकतात
उरी सिनेमातून आपला दमदार अभिनयाची झलक दाखवत फॅन्सच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली. अभिनेत्री कॅटरिना कैफने विक्की कौशलच्या कामाचे कौतूक करत त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर विक्की आणि कॅट लवकरच एकत्र दिसू शकतात. रोनी स्क्रूवाला निर्मिती एक रोमाँटिक सिनेमात ही जोडी दिसू शकते. स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार यात काहीच तथ्य नाहीय. सध्या अशी कोणतीच चर्चा नाही ज्यानुसार हे दोघे एकत्र दिसणार आहेत.
वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, विक्की सध्या सरदार उधम सिंग सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. काही दिवसांपूर्वी विक्कीचा सरदार उधम सिंगमधला लूक आऊट झाला होता. सरदार उधम सिंग हा चित्रपट भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या आधीच्या काळातील आहे. सरदार उधम सिंग या चित्रपटात उधम सिंगची व्यक्तिरेखा पहिल्यांदा इरफान खान साकारणार होता. पण इरफानने आजारपणामुळे हा चित्रपट करण्यास नकार दिला. त्यामुळे या भूमिकेसाठी विकीची निवड करण्यात आली.
कॅटबाबत बोलायचे झाले तर ती सध्या भारत सिनेमाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यात ती पुन्हा एकदा सलमान खानसोबत दिसणार आहे. ‘भारत’ हा चित्रपट ‘आॅड टू माई फादर’ या कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. भारतमध्ये सलमान खान, दिशासह कतरीना कैफ, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर आणि तब्बू अशी कलाकारांची तगडी फौज आहे. हा सिनेमा 5 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.