...म्हणून अमिताभ बच्चन ATM चा वापर करत नाहीत; बायकोकडून मागतात पैसे; म्हणाले- "मला ते सगळं..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 13:08 IST2024-12-27T13:03:11+5:302024-12-27T13:08:52+5:30
बॉलिवूड अभिनेते, महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची आजही चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळते.

...म्हणून अमिताभ बच्चन ATM चा वापर करत नाहीत; बायकोकडून मागतात पैसे; म्हणाले- "मला ते सगळं..."
Amitabh Bachchan: बॉलिवूड अभिनेते, महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची आजही चाहत्यांमध्ये क्रेझ पाहायला मिळते. सध्या अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती'च्या १६ व्या पर्वामुळे सातत्याने चर्चेत येत आहेत. या कार्यक्रमामध्ये ते अगदी मनमोकळेपणाने बोलत असतात. आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत ते अनेक खुलासेही करत असतात. दरम्यान, अलिकडेच त्यांनी या शोमध्ये एक मजेदार किस्सा शेअर केला.
'कौन बनेगा करोपडती'च्या शोमध्ये हॉयसीटवर बसलेल्या एका स्पर्धकाने बिग बींना काही हटके प्रश्न विचारले. त्यादरम्यान या स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांना प्रश्न विचारला की , जेव्हा मी ऑफिसवरून घरी जात असते तेव्हा माझी आई मला कोथिंबीर आण किंवा इतर काही वस्तू आणायला सांगते. मग तुम्ही शूटवरून घरी जात असता त्यावेळी जया मॅम तुम्हाला अशा काही गोष्टी आणायला सांगतात का? त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, "हो, ती सांगते. म्हणते तुम्ही स्वत: व्यवस्थितपणे घरी या. त्यानंतर बिग बींनी सांगितलं, जयाजींना गजरा खूप आवडतो. मग मी रस्त्यात लहान मुले गजरा विकायला येतात त्यांच्याकडून गजरा, हार घेतो आणि मग तो हार, गजरा मी त्यांना देतो किंवा गाडीमध्येच ठेवतो.
पुढे या स्पर्धकाने असा प्रश्न विचारला की, अमिताभ बच्चन त्यांचा बॅंक बॅलेन्स चेक करण्यासाठी किंवा पैसे काढण्यासाठी एटीएम गेले आहेत का? तेव्हा बिग बी म्हणाले, "ना मी कधीच स्वत: जवळ पैसे ठेवतो किंवा ना कधी एटीएममध्ये गेलोय. कारण मला ते सगळं काय आणि कसं करतात ते समजत नाही. पण, जयाजींकडे पैसे असतात त्यामुळे मी त्यांच्याकडून पैसे मागतो." असे मजेदार खुलासे त्यांनी केले.