कविता कौशिकच्या योगा पोजने वेधले अनुराग कश्यपचे लक्ष, फोटोवर दिलेली कमेंटही होतेय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 07:16 PM2020-09-17T19:16:19+5:302020-09-17T19:16:52+5:30
लग्नानंतर अनेकांनी कविताला तिच्या फॅमिली प्लॅनिंगवर प्रश्न विचारले होते. त्यावेळी कविताने मोठा खुलासा केला होता. कधीही आई न होण्याचा निर्णय तिने घेतल्याचे स्पष्ट केले होते.
अभिनेत्री कविता कौशीक फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे. सध्या योगा करतानाचे विविध पोज ती सोशल मीडियावर शेअर करते. तिचे योगाचे व्हिडीओ फोटो पाहून चाहतेही कमेंट करत तिचा उत्साह वाढवत असतात. तसेच कविता कौशिकचे हे व्हिडीओ फोटो चाहत्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यामुळे तिच्या सौंदर्यांचे आणि फिटनेसचं हेच गुपित असल्याचेही ती सांगते. अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरलेली कविता कौशिक तिच्या खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. त्यामुळेच की काय अनेक अभिनेत्रींना ती फिटनेसच्या बाबतीत कडवी टक्कर देते.
Aur bataao 💜 pic.twitter.com/jpyeUtCTgL
— Kavita (@Iamkavitak) September 17, 2020
फिट राहावं आणि सौंदर्य टिकून राहावं यासाठी कविता बरीच मेहनत घेते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला होता. हा फोटो पाहून बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपचेही लक्ष वेधून घेतले. बसण्याचा हा कोणता प्रकार आहे? अशा प्रकारे बसून मी देखील नो स्मोकिंग सिनेमाची संपूर्ण स्क्रीप्ट लिहीली होती.
कविताच्या पोस्टवर अनुराग कश्यपने केलेली कमेंट तिला खूप आवडली. सध्या तिचा हा फोटो खूप व्हायरल झाला आहे. चाहते देखील फोटोंवर कमेंटस आणि लाईक्स देत पसंती देत असल्याचे पाहायला मिळत आहे.
फिट राहण्यासाठी योगा हाच उत्तम उपाय
नियमित योगा करण्याबद्दल कविता सांगते,नुसते शारीरिक स्वास्थ्य असून चालत नाही तर त्या बरोबर मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य राहिलं पाहिजे. रोज आपल्या मनात आणि शरीरात साठून राहणाऱ्या ताण तणावांचा निचरा करायचा असेल तर त्यासाठी योगाचा काही मिनिटांचा दैनंदिन सराव पुरेसा असतो. योगासने, प्राणायाम आणि ध्यान धारणा ही सर्व ताण तणाव नाहीशी करणारी प्रभावी तंत्रे आहेत. योगाच्या सरावाने शरीरातील विष द्रव्ये आणि ताण तणाव शरीराबाहेर कशी टाकली जातात याचा अनुभव जेंव्हा तुम्ही दररोज योगा करता तेव्हा येतो."
कधीही आई न होण्याचा घेतला होता निर्णय
लग्नानंतर अनेकांनी कविताला तिच्या फॅमिली प्लॅनिंगवर प्रश्न विचारले होते. त्यावेळी कविताने मोठा खुलासा केला होता. कधीही आई न होण्याचा निर्णय तिने घेतल्याचे स्पष्ट केले होते. मी माझ्या मुलावर कुठलाही अन्याय करू इच्छित नाही. 40 व्या वर्षी मी आई होणार असेल तर माझा मुलगा 20 वर्षाचा होईपर्यंत मी वृद्धापकाळाच्या उंबरठ्यावर असेन. केवळ 20 व्या वर्षी माझ्या मुलावर त्याच्या म्हाता-या आई - वडिलांची जबाबदारी यावी हे मला नको आहे असे कविताने सांगितले होते.