“तेव्हा ऐश्वर्या माझी सून नव्हती, पण...”, बिग बींनी सांगितला ‘कजरा रे’ गाण्याचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 18:50 IST2023-08-25T18:49:29+5:302023-08-25T18:50:51+5:30
'बंटी और बबली' चित्रपटातील ‘कजरा रे’ हे गाणं खूप लोकप्रिय ठरलं होतं. या गाण्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय एकत्र थिरकताना दिसले होते.

“तेव्हा ऐश्वर्या माझी सून नव्हती, पण...”, बिग बींनी सांगितला ‘कजरा रे’ गाण्याचा किस्सा
बिग बी अमिताभ बच्चन पुन्हा एकदा ‘कौन बनेगा करोपती’चं नवं पर्व घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या शोमध्ये स्पर्धकांबरोबर बोलताना ते अनेक किस्सेही शेअर करतात. केबीसीमधील एका एपिसोडमध्ये बिग बींनी कजरा रे गाण्याचा किस्सा सांगितला आहे. हा किस्सा सांगताना अमिताभ बच्चन यांनी सून आणि बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचं कौतुकही केलं.
'बंटी और बबली' चित्रपटातील ‘कजरा रे’ हे गाणं खूप लोकप्रिय ठरलं होतं. या गाण्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय एकत्र थिरकताना दिसले होते. ऐश्वर्याचं 'बंटी और बबली'मधील हे आयटम साँग प्रचंड हिट झालं होतं. 'कजरा रे' गाण्याचा किस्सा सांगताना बिग बी म्हणाले, “त्या गाण्यात आम्ही तिघंही आहोत. तेव्हा ऐश्वर्या माझी सून नव्हती. पण, आता आहे. त्या गाण्यातही ती माझी सूनच होती. अभिषेक आणि मीदेखील त्या गाण्यात होतो.”
“...म्हणून मी सनी देओलच्या लेकाच्या लग्नाला गेले नाही”, हेमा मालिनींनी सांगितलं खरं कारण
२००५ साली 'बंटी और बबली' चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन ही पितापुत्रांची जोडी एकत्र दिसली होती. बॉलिवूड अभिनेत्री रानी मुखर्जी या चित्रपटात मुख्य नायिकेच्या भूमिकेत होती. २०२१ साली या चित्रपटाचा सीक्वेलही प्रदर्शित करण्यात आला होता.