KBC च्या दहाव्या सिझनची आहे ही थिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 04:02 PM2018-08-21T16:02:53+5:302018-08-22T08:30:00+5:30
अश्विनी कौन बनेगा करोडपतीसाठी पती नितेश तिवारी सोबत काम करते आहे आणि या कार्यक्रमाशी निगडीत प्रत्येक गोष्ट तिला खूप जवळची वाटते.
नितेश तिवारी दिग्दर्शित कौन बनेगा करोडपतीच्या पहिल्या प्रोमोला चांगला प्रतिसाद मिळाला असून त्यात आपल्या मुलाला चांगले शिक्षण देण्यासाठी वडिलांनी केलेला संघर्ष चित्रित करण्यात आला होता. आणि त्या नंतर नितेशची पत्नी अश्विनी अय्यर तिवारीने दुसरा प्रोमो दिग्दर्शित केला, ज्यामध्ये पायलट बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणार्या एका महिलेचा निर्धार सुंदर रित्या दाखवण्यात आला होता. परिवार आणि मित्रमंडळी यांची साथ नसूनही आपली महत्त्वाकांक्षा तिने सोडली नाही आणि हॉट सीटवर पोहोचून आपले लक्ष्य अधिक सुसाध्य करण्याचा तिने प्रयत्न केला. या प्रोमोच्या दिग्दर्शनाच्या अनुभवाबद्दल विचारले असता अश्विनी सांगते, “कित्येक वर्षांपूर्वी कौन बनेगा करोडपती लाँच झाले, तेव्हापासून मी त्याच्यावर काम करते आहे. अनेक वर्षांपासून एजन्सीमधील क्रिएटिव्ह संचालक म्हणून आम्ही या ब्रॅंडसाठी लिखाण करून त्यास लुक आणि फील देत आहोत. कौन बनेगा करोडपती आणि अमिताभ बच्चन यांच्यावरील प्रेमापोटी आम्ही आणि क्लाईन्ट मिळून अनेक नवनवीन कल्पना शोधून काढत आहोत.”
अश्विनी कौन बनेगा करोडपतीसाठी पती नितेश तिवारी सोबत काम करते आहे आणि या कार्यक्रमाशी निगडीत प्रत्येक गोष्ट तिला खूप जवळची वाटते.
‘कब तक रोकोगे’चा अर्थ तुझ्यासाठी काय आहे आणि तू तुझ्या आयुष्यात कधी असा क्षण अनुभवला आहेस का असे विचारले असता ती सांगते, “तुम्ही कुणीही असाल, कुठूनही आलेले असाल... पण तुम्हाला तुमच्या पद्धतीने जीवन जगण्याचा आणि मोठी स्वप्ने बघण्याचा अधिकार आहे आणि हो, जेव्हा मी माझी पहिली फीचर फिल्म बनवण्याचे ठरवले आणि त्याचे दिग्दर्शन करण्याचे ठरवले, तेव्हा लोकांकडून अनेक प्रतिकूल प्रतिक्रिया आल्या. त्यांना वाटत होते की, मी मी दिग्दर्शन करू शकणार नाही. अनेकांनी मला सांगितले की, ‘तुझ्या अॅड फिल्मवर देखील कोणी विश्वास ठेवणार नाही; फीचर फिल्म तर विसरूनच जा’. पण मला विश्वास होता आणि माझ्या जवळच्या लोकांची साथ होती. हाच माझा ‘कब तक रोकोगे’ क्षण होता.”
कौन बनेगा करोडपती (KBC) ज्ञानाच्या ताकदीशी संबंधित आहे. ते ज्ञान, जे सामान्य स्त्री आणि पुरुषाला अत्यंत बिकट अडचणींना न जुमानता, त्यांचे ईप्सित साध्य करण्यासाठी सक्षम बनवते. 10व्या सत्रात देखील अमिताभ बच्चन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहेत. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील KBCची थीम यावेळी कब तक रोकोगे ही असणार आहे.