OMG...! सुशांत सिंग राजपूतने सारा अली खानला इंस्टाग्रामवर केले अनफॉलो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 20:00 IST2019-03-22T20:00:00+5:302019-03-22T20:00:00+5:30
काही दिवसांपूर्वी अभिनेता सुशांत सिंग राजपूतने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील सर्व पोस्ट्स डिलिट केल्या होत्या. त्यात आता तर केदारनाथ चित्रपटातील सहकलाकार सारा अली खानलादेखील अनफॉलो केले आहे.

OMG...! सुशांत सिंग राजपूतने सारा अली खानला इंस्टाग्रामवर केले अनफॉलो
अभिनेत्री सारा अली खानने गेल्या वर्षी केदारनाथ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात ती सुशांत सिंग राजपूतसोबत झळकली होती. या चित्रपटातील त्या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती. यादरम्यान ते दोघे एकमेकांना डेट करत असल्याची चर्चादेखील रंगली होती. मात्र नुकतेच असे काही घडले ज्यामुळे सुशांत सिंग राजपूत व सारा अली खानच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.
सुशांत सिंग राजपूतने सारा अली खानला इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. जेव्हा पासून दोघे केदारनाथमध्ये काम करत होते तेव्हा पासून ते एकमेकांना इंस्टाग्रामवर फॉलो करत होते. मात्र अचानक सुशांतचे साराला अनफॉलो करणे जरा विचित्र वाटले. यापूर्वी सुशांतने इंस्टाग्रामवरील त्याचे सर्व पोस्ट डिलिट केले होते. त्यासोबत त्याने लिहिले होते की, आता मी इथे (इंस्टाग्रामवर) नाही. नुकतेच त्याने होळीवर दोन पोस्ट्सदेखील शेअर केल्या. सुशांतने भलेही साराला अनफॉलो केले असले तरी सारा आताही त्याला इंस्टाग्रामवर फॉलो करते आहे.
केदारनाथ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सारा व सुशांत यांच्या डेटिंगची चर्चा सुरू होती. असेही समजले होते की सुशांतच्या वाढदिवसासाठी साराने तिची ट्रिपदेखील रद्द केली होती आणि केक घेऊन त्याच्या घरी पोहचली होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुशांत व सारा फक्त मित्र आहेत आणि ते एकमेकांना अजिबात डेट करत नाहीत.
साराने देखील करण जोहरचा चॅट शो कॉफी विद करणमध्ये कार्तिक आर्यनवर क्रश असल्याचे सांगितले होते.