श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अदा शर्मानं गायलं भजन, Viral Video एकदा बघाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 17:23 IST2024-08-27T17:22:56+5:302024-08-27T17:23:23+5:30
अदा सोशल मीडियावर विविध व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अदाच्या व्हिडीओवर तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त अदा शर्मानं गायलं भजन, Viral Video एकदा बघाच
Adah Sharma : 'दे केरळा स्टोरी' फेम अदा शर्मा चांगलीच चर्चेत असते. अदा सोशल मीडियावर विविध व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांमध्ये चर्चेत असते. अदाच्या व्हिडीओवर तिचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. तिचे डान्स रिल्स असो किंवा मराठी भाषेतील गाणी सोशल मीडियावरील तिच्या ऍक्टिव्हिटीज सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. आता अदा 'भजन' गात असल्याचं दिसून आलं. अदा शर्माने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
अदाचं मराठी प्रेम काही लपून राहिलेलं नाही. तिचे मराठी कवितांचे व्हिडीओही व्हायरल होतात. नुकतंच अदाने मराठीत भजन गातानाचा व्हिडीओ शेअर चाहत्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओमध्ये अदाने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केल्याचं दिसत आहे. तर तिच्या गळ्यात श्रीकृष्णाची माळ आणि हातात टाळ दिसून येत आहे. तिने मराठीत गायलेल्या भजनाचे चाहत्यांकडून कौतुक केले जात असून तिच्या आवाजाचेही कौतुक केले जात आहे. तिच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडला आहे.
अदा अनेकदा मराठी भाषेत बोलून व्हिडीओ बनवत असते. अनेकजण तिचे हे व्हिडीओ शेअर करतात आणि तिचं कौतुक सुद्धा करतात. अदाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर २०२३ साली आलेल्या 'द केरळा स्टोरी' सिनेमातून ती खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आली. या सिनेमाच्या कथेचं आणि अदाच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. याशिवाय नुकत्याच रिलीज झालेल्या 'बस्तर - द नक्सल स्टोरी' सिनेमात अदा शर्मा झळकली. हा सिनेमा मात्र बॉक्स ऑफीसवर अपयशी ठरला. आता अदाच्या नवीन प्रोजेक्टची चाहत्यांना आतुरता आहे.