अक्षय कुमारच्या 'केसरी-२' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात; तिसऱ्या दिवशी केली इतकी कमाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 09:05 IST2025-04-21T09:02:01+5:302025-04-21T09:05:06+5:30

सध्या मनोरंजनविश्वात 'केसरी-२' या चित्रपटाबद्दल तुफान चर्चा आहे.

kesari 2 movie box office collection day 3 starrer akshay kumar r madhavan and ananya panday | अक्षय कुमारच्या 'केसरी-२' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात; तिसऱ्या दिवशी केली इतकी कमाई

अक्षय कुमारच्या 'केसरी-२' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात; तिसऱ्या दिवशी केली इतकी कमाई

Kesari 2 Box Office Collection Day 3: सध्या मनोरंजनविश्वात 'केसरी-२' या चित्रपटाबद्दल तुफान चर्चा आहे. अक्षय कुमार (Akshay Kumar), आर माधवन (R Madhavan) आणि अनन्या पांडे (Ananya Panday)यांची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. हा बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित चित्रपट १८ एप्रिल या दिवशी संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. पहिल्या दोन दिवसांमध्ये 'केसरी-२' ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात पाहायला मिळाली. पण, आता चित्रपटाचं तिसऱ्या दिवसाचं कलेक्शन समोर आलं आहे. तिसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत चांगली वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. 

दरम्यान, अक्षय कुमारच्या 'केसरी-२' चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर ७.८४ कोटी रुपये कमावले तर दुसऱ्या दिवशी १०.०८ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. त्यात आता तिसऱ्या दिवशी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जम बसवला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'केसरी-२' चित्रपटाने तिसऱ्या दिवशी ११.८४ कोटी इतकी कमाई केली आहे. त्यामुळे चित्रपटाचं एकूण कलेक्शन २९.७० कोटी इतकं झालं आहे. परंतु, या आकड्यांमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो.

'केसरी-२' १९१९ च्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध न्यायालयात लढा देणारे बॅरिस्टर सी. शंकरन नायर यांच्या जीवनावर आधारित आहे. सिनेमात अक्षयने नायर यांची भूमिका केली आहे, तर आर माधवन ब्रिटीश वकिलाच्या आणि अनन्या पांडेने दिलरीत गिलच्या भूमिकेत आहे. 'केसरी-२' चित्रपटाचं दिग्दर्शन करण सिंग त्यागी यांनी केलं आहे. तर धर्मा प्रोडक्शनची निर्मिती आहे.

Web Title: kesari 2 movie box office collection day 3 starrer akshay kumar r madhavan and ananya panday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.