Kesari Box Office : २०१९ मधील सगळ्या चित्रपटांचा केसरीने मोडला हा विक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2019 03:46 PM2019-03-28T15:46:45+5:302019-03-28T15:48:52+5:30
फिल्म अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये या चित्रपटाने कोणत्या दिवशी किती कलेक्शन केले याविषयी देखील सांगितले आहे.
अक्षय कुमार आणि परिणिती चोप्राच्या केसरी सिनेमाची बॉक्स ऑफिसवर चांगलीच घौडदौड सुरू आहे. ‘सारागढी’च्या युद्धाची वीरगाथा मांडणारा अक्षय कुमारच्याकेसरीला प्रेक्षकांनी पसंतीची पोचपावती दिली असून यंदाच्या ‘बिगेस्ट ओपनर’ सिनेमांच्या लिस्टमध्ये ‘केसरी’ने पहिले स्थान मिळवले आहे.
‘केसरी’ हा सिनेमा जगभरातील ४२०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला होता आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने इतिहास रचला. पहिल्याच दिवशी केसरीने २१. ५० कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी १६.७५ कोटी आणि तिसऱ्या दिवशी १८.७५ कोटींचा गल्ला जमावलाय. पहिल्या पाच दिवसात केसरीने ऐकूण ७८.०७ कोटींची कमाई केली होती आणि आता अक्षय कुमारच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे.
या चित्रपटाने १०० करोडचा टप्पा पार पाडला आहे. केवळ सातव्याच दिवशी १०० करोडचा गल्ला जमवून या चित्रपटाने एक विक्रम केला आहे. २०१९ मध्ये सगळ्यात जलद १०० कोटी कमावणारा हा चित्रपट ठरला असून अक्षयच्या हिट चित्रपटामध्ये आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. २०१९ मध्ये गली बॉय या चित्रपटाने आठ दिवसांत १०० कोटींचे कलेक्शन केले होते. पण केसरीने आता या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. फिल्म अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये या चित्रपटाने कोणत्या दिवशी किती कलेक्शन केले याविषयी देखील सांगितले आहे.
#Kesari is now *fastest* ₹ 100 cr grosser of 2019 [so far]... Crosses ₹ 100 cr on Day 7... Thu 21.06 cr, Fri 16.75 cr, Sat 18.75 cr, Sun 21.51 cr, Mon 8.25 cr, Tue 7.17 cr, Wed 6.52. Total: ₹ 100.01 cr. India biz... ₹ 100 cr in days: #GullyBoy [Day 8]. #TotalDhamaal [Day 9].
— taran adarsh (@taran_adarsh) March 28, 2019
केसरीला पहिल्या दिवसांपासून समीक्षकांची आणि प्रेक्षकांची पसंती मिळाली आणि आता तर माऊथ पब्लिसिटी या जोरावर ‘केसरी’कडून बक्कळ कमाईची अपेक्षा केली जात आहे. ‘केसरी’ची निर्मिती धर्मा प्रॉडक्शनने केली आहे तर अनुराग सिंहने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. अक्षयने यात हवालदार इशार सिंगची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १८९७ साली झालेल्या सारागढी लढाईवर आधारीत आहे. या युद्धात २१ शिखांनी १०००० अफगाणांविरोधात लढाई केली होती. या चित्रपटात अक्षय कुमार सोबत परिणीती चोप्रा सोबतच मीर सरवर मुख्य भूमिकेत आहे.