रिलीजच्या तीन दिवसांपूर्वीच 'केसरी वीर' च्या डेटमध्ये बदल, आता 'या' तारखेला होणार प्रदर्शित, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 14:30 IST2025-03-11T14:26:55+5:302025-03-11T14:30:17+5:30
सोमनाथ मंदिरावरील हल्ल्याच्या ऐतिहासिक कथेवर आधारित 'केसरी वीर' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

रिलीजच्या तीन दिवसांपूर्वीच 'केसरी वीर' च्या डेटमध्ये बदल, आता 'या' तारखेला होणार प्रदर्शित, कारण काय?
Kesari Veer New Release Date: सोमनाथ मंदिरावरील हल्ल्याच्या ऐतिहासिक कथेवर आधारित 'केसरी वीर' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार? याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. परंतु, आता चित्रपट प्रदर्शित होण्यास तीन दिवस असताना अचानक 'केसरी वीर'च्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला. आता या सिनेमासाठी प्रेक्षकांना थोडी आणखी वाट पाहावी लागणार आहे. सोशल मीडियावर 'पॅनोरमा स्टुडिओज'ने याबाबत पोस्ट शेअर करत सिनेरसिकांना माहिती दिली आहे.
येत्या १४ मार्च २०२५ ला 'केसरी वीर: लिजेंड ऑफ सोमनाथ' चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार होता. त्यात आता पॅनोरमा स्टुडिओजकडून केसरी वीरची नवीन रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. सोमनाथ के महान योद्धा की कहानी."'केसरी वीर: लिजेंड ऑफ सोमनाथ' १६ मे २०२५ रोजी जगभरात रिलीज करण्यात येणार आहे...",असं कॅप्शन देत 'पॅनोरमा स्टुडिओज'च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे. चित्रपट वर्ल्डवाइड लॉन्च करण्याच्या दृष्टीने रिलीज डेट बदलण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, 'केसरी वीर: लिजेंड ऑफ सोमनाथ' चित्रपटात सुनील शेट्टी आणि सूरज पांचोली योद्ध्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'केसरी वीर: लिजेंड ऑफ सोमनाथ' चित्रपटाचं दिग्दर्शन प्रिन्स धीमान यांनी केलं आहे. या सिनेमात विवेक ओबेरॉय नकारात्मक भूमिकेत आहे. तसेच या चित्रपटातून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आकांक्षा शर्मा डेब्यू करते आहे.