KGF 2 : बॉक्स ऑफिसवर त्सुनामी बनला यशचा KGF 2, दोन दिवसात केली इतकी छप्परफाड कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 03:20 PM2022-04-16T15:20:34+5:302022-04-16T15:20:43+5:30

KGF 2 Box Office Collection : यशच्या KGF 2 ने पहिल्या दिवशीच ५२ कोटी रूपयांची मोठी कमाई केली, तर आता दुसऱ्या दिवशीही सिनेमाने धुमाकूळ घातला आहे.

KGF 2 box office collection day 2 : Yash film enters in 100 cr club | KGF 2 : बॉक्स ऑफिसवर त्सुनामी बनला यशचा KGF 2, दोन दिवसात केली इतकी छप्परफाड कमाई

KGF 2 : बॉक्स ऑफिसवर त्सुनामी बनला यशचा KGF 2, दोन दिवसात केली इतकी छप्परफाड कमाई

googlenewsNext

KGF 2 Box Office Collection :  साऊथचा सुपरस्टार यशचा सिनेमा KGF 2 ने बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. रिलीज झाल्या झाल्या सिनेमाने मोठमोठ्या बॉलिवूड आणि साऊथच्या सिनेमांना केजीएफने धूळ चारली आहे. यशच्या KGF 2 ने पहिल्या दिवशीच ५२ कोटी रूपयांची मोठी कमाई केली, तर आता दुसऱ्या दिवशीही सिनेमाने धुमाकूळ घातला आहे.

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, यशच्या KGF 2 ने दोन दिवसात १०० कोटीच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली आहे. हे सिनेमाच्या केवळ हिंदीचं व्हर्जनचं कलेक्शन आहे. त्यामुळे KGF 2 बॉक्स ऑफिसवर त्सुनामी बनला आहे. यशच्या सिनेमाने दुसऱ्या दिवशी  ४६.७९ कोटी रूपयांची कमाई केली आहे. यासोबतच सिनेमाच्या एकूण कमाईचा आकडा १००.७४ कोटी रूपये झाला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शने दुसऱ्या दिवसाच्या कमाईची आकडेवारी शेअर केली आहे. 

तरण आदर्शनुसार, KGF 2 बाहुबली २ आणि दंगलपेक्षा चांगला चालत आहे. आशा आहे की, ४ दिवसात या सिनेमाची कमाई १८५ कोटी रूपये होईल. पहिल्या दिवशी गुरूवारी या सिनेमाने ५३.९५ कोटी रूपयांची कमाई केली होती. असं करून हा सिनेमा हायस्ट फर्स्ड डे ओपनर सिनेमा बनला आहे. केवळ देशातच नाही तर परदेशातही या सिनेमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. केजीएफने वर्ल्ड वाइड कमाईत ३०० कोटींचा आकडा पार केला आहे.

केजीएफ २ मध्ये यशसोबतच संजय दत्त आणि रवीना टंडन मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शना आकडेवारीवरून तुम्हाला समजलं असेलच की, सिनेमा धुमाकूळ घातल आहे. 
 

Web Title: KGF 2 box office collection day 2 : Yash film enters in 100 cr club

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.