धमाका! यशच्या ‘KGF 2’ने अवघ्या 24 तासांत ‘आरआरआर’ला पिछाडलं ...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 05:07 PM2022-03-28T17:07:10+5:302022-03-28T17:17:31+5:30

KGF 2 Trailer beats RRR-Radhe Shyam: कन्नड सुपरस्टार यशचा अपकमिंग सिनेमा ‘केजीएफ 2’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाची सध्या जबरदस्त क्रेझ पाहायला मिळतेय.

kgf 2 trailer becomes most viewed trailer beating rrr and radhe shyam within 24 hours | धमाका! यशच्या ‘KGF 2’ने अवघ्या 24 तासांत ‘आरआरआर’ला पिछाडलं ...!!

धमाका! यशच्या ‘KGF 2’ने अवघ्या 24 तासांत ‘आरआरआर’ला पिछाडलं ...!!

googlenewsNext

KGF 2 Trailer beats RRR-Radhe Shyam: कन्नड सुपरस्टार यशचा अपकमिंग सिनेमा ‘केजीएफ 2’ (KGF 2)लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. येत्या 14 एप्रिलला हा सिनेमा चित्रपटगृहांत धडकणार आहे. या चित्रपटाची सध्या जबरदस्त क्रेझ पाहायला मिळतेय. काल याचा पुरावा मिळालाच. होय, काल ‘केजीएफ 2’चा ट्रेलर रिलीज झाला आणि या ट्रेलरला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. ट्रेलर रिलीज होताच सोशल मीडियावर जणू धमाका केला. या ट्रेलरने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला. कन्नड, हिंदी, तामिळ, तेलगू आणि मल्याळम या पाचही भाषेतील या ट्रेलरनं प्रेक्षकांना क्रेझी केलं. मग काय? ‘केजीएफ 2’च्या ट्रेलरने नुकत्याच रिलीज झालेल्या ‘RRR’ ला देखील मागे टाकलं.

‘केजीएफ 2’च्या ट्रेलरला विक्रमी व्ह्युज मिळाले. इंडियन बॉक्स ऑफिसच्या रिपोर्टनुसार, ‘केजीएफ 2’ने सर्व भाषेतील ट्रेलर मिळून 15 तासांत 70 मिलियन व्ह्युज मिळवत नवा विक्रम रचला. यापूर्वी रिलीज झालेल्या सुपरस्टार प्रभासच्या ‘राधे श्याम’ या चित्रपटाच्या ट्रेलरला 24 तासांत 57.5 मिलियन व्ह्युज मिळाले होते. तर सुपरस्टार रामचरण आणि ज्युनिअर एनटीआरच्या ‘आरआरआर’ला 24 तासांत 51.12 व्ह्युज मिळाले होते.

प्रमोशन सुरू
  ‘केजीएफ 2’ या सिनेमात यश याच्याशिवाय संजय दत्त व रवीना टंडन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. प्रशांत नील यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाचं प्रमोशन सुरू झालं आहे. काल एका ग्रँड सोहळ्यात ‘केजीएफ 2’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला. रवीना, संजय दत्त या इव्हेंटला हजर होते. करण जोहरने हा इव्हेंट होस्ट केला होता.
 

Web Title: kgf 2 trailer becomes most viewed trailer beating rrr and radhe shyam within 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.