तिसरा चॅप्टर येणार आणि...; ‘KGF 3’बद्दल ‘रॉकी भाई’ने दिली मोठी हिंट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 10:27 AM2022-04-27T10:27:34+5:302022-04-27T10:34:12+5:30
Yash Hints About KGF: Chapter 3 : ‘केजीएफ 3’ येणार हे निश्चित आहे. खुद्द सुपरस्टार यशने हे कन्फर्म केलं आहे. अर्थात त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
‘केजीएफ’ला अभूतपूर्व यश मिळालं आणि त्यामुळे मेकर्सनी ‘केजीएफ 2’ (KGF: Chapter 2) बनवण्याचा निर्णय घेतला. गेल्या 14 एप्रिलला ‘केजीएफ 2’ रिलीज झाला आणि या चित्रपटाच्या त्सुनामीत जर्सी व बीस्ट सारख्या सिनेमांचीही पार वाताहत झाली. ‘केजीएफ 2’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. 12 दिवसांत या चित्रपटाने वर्ल्डवाईड 907.30 कोटींची कमाई केली. ‘केजीएफ 2’ लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला. आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती ‘केजीएफ 3’ची.
‘केजीएफ 2’च्या पोस्ट क्रेडिट सीनमध्येच दिग्दर्शक प्रशांत नील (Prashanth Neel) यांनी या चित्रपटाच्या तिसऱ्या पार्टचे अर्थात ‘केजीएफ 3’चे (KGF: Chapter 3) संकेत दिले होते. तेव्हापासून चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. ‘केजीएफ 3’मध्ये सीआयएच्या एन्ट्रीनंतर काय होणार? रमिका सेन रॉकीविरोधात डेथ वॉरंट काढणार का? रॉकी मरणार की जगावर राज्य करण्याचं आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करणार? हे जाणून घेण्याची चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं चाहत्यांना मिळणार आहेत. अर्थात त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण ‘केजीएफ 3’ येणार हे निश्चित आहे. खुद्द सुपरस्टार यशने (Yash) हे कन्फर्म केलं आहे.
‘केजीएफ 3’मध्ये दमदार सीन्स असणार
Varietyला दिलेल्या मुलाखतीत यश ‘केजीएफ 3’बद्दल बोलला. रॉकीच्या आयुष्यात आणि या कथेत खूप काही आहे. हे तिसºया पार्टमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार. मी आणि प्रशांत आम्ही दोघांनी ‘केजीएफ 3’साठी खूप सीन्सचा विचार केला आहे. डोक्यात अनेक कल्पना आहेत. अनेक गोष्टी आम्ही ‘केजीएफ 2’ करू शकत नव्हतो. ती सर्व कसर आम्ही ‘केजीएफ 3’मध्ये भरून काढणार आहोत, असं यश म्हणाला.
‘केजीएफ 1’ रिलीज झाला तेव्हा टेन्शनमध्ये होता यश
होय, ‘केजीएफ 1’ रिलीज झाला तेव्हा यश काहीसा टेन्शनमध्ये होता. कारण प्रशांत नील यांनी ‘केजीएफ’ या केवळ एका चित्रपटाचा विचार केला होता. म्हणजे, याचा सीक्वल वा तिसरा पार्ट बनवण्याचा कोणताही इरादा नव्हता. पण प्रॉडक्शनचं काम अर्ध पूर्ण झाल्यावर टीमने स्क्रिप्टवर पुन्हा नव्यानं काम सुरू करण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम म्हणजे, स्क्रिप्ट दोन भागात तयार झाली. ‘केजीएफ 1’ ब्लॉकबस्टर ठरल्यावर मेकर्सनी लगेच ‘केजीएफ 2’चं काम सुरू केलं. सुरूवातीला ‘केजीएफ 1’ला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हा विचार करून यश थोडा घाबरलेला होता. कारण पहिला पार्ट हिट झाला नाही तर दुसरा पार्ट बनणार नव्हता. पण ‘केजीएफ 1’ तुफान गाजला. ‘केजीएफ 2’ त्यापेक्षाही गाजला आणि आता म्हणूनच ‘केजीएफ 3’ची तयारी सुरु झाली आहे.