संजय दत्तसाठी 'KGF Chapter 2' आहे खूप खास, पोस्ट शेअर करत म्हणाला - 'यातून मला...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 14:25 IST2022-04-23T14:24:42+5:302022-04-23T14:25:15+5:30
Sanjay Dutt: संजय दत्तचा केजीएफ २ ( KGF Chapter 2) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला मिळणाऱ्या रिस्पॉन्समुळे अभिनेता खूप खूश आहे.

संजय दत्तसाठी 'KGF Chapter 2' आहे खूप खास, पोस्ट शेअर करत म्हणाला - 'यातून मला...'
बॉलिवूडचा संजूबाबा म्हणजेच संजय दत्त(Sanjay Dutt)चा केजीएफ २( KGF Chapter 2) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाद्वारे संजय दत्तने कन्नड चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाला मिळणाऱ्या रिस्पॉन्समुळे संजय दत्त खूप खूश आहे. नुकतेच अभिनेत्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की केजीएफ २ ने माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढले हे नेहमी लक्षात राहील. ६२ वर्षीय अभिनेता संजय दत्तने पीरियड अॅक्शन ड्रामा चित्रपट केजीएफ २मध्ये खलनायक अधीराची भूमिका साकारली होती. २०१८ च्या ब्लॉकबस्टर चित्रपट केजीएफ चाप्टर १ चा हा दुसरा भाग आहे.
प्रशांत नील दिग्दर्शित केजीएफच्या चाप्टर एक आणि दोन भागांचा चित्रपट रॉकी (यश) ची कथा आहे. रॉकी हा एक अनाथ आहे जो गरिबीतून उठून सोन्याच्या खाणीचा राजा बनतो. १४ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आज संजय दत्तने सोशल मीडियावर एक नोट पोस्ट केली की माझ्यासाठी नेहमीच असे काही चित्रपट असतील जे इतरांपेक्षा जास्त खास असतील.
संजय दत्तने पोस्टमध्ये लिहिले की, 'प्रत्येक वेळी मी माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढणारा चित्रपट शोधतो. 'KGF Chapter 2' हा माझ्यासाठी तो चित्रपट होता. याने मला माझ्या क्षमतेची आठवण करून दिली आणि याबद्दल मला जाणीव झाली की जे मी म्हणू शकतो की मला खरोखर आनंद झाला. अधीराची भूमिका साकारण्याचे श्रेय दिग्दर्शक नीलला जाते.
संजय दत्त पुढे म्हणाला की, माझा दिग्दर्शक प्रशांत नीलने मला 'अधीरा'ची पार्श्वभूमी उत्तमरित्या सांगितली. या चित्रपटातील माझ्या भूमिकेचे श्रेय संपूर्णपणे प्रशांतला जाते.
संजय दत्तने पाठिंबा दिल्याबद्दल चाहते, हितचिंतक आणि कुटुंबीयांचे आभार मानले. संजय दत्त व्यतिरिक्त या चित्रपटात यश, रवीना टंडन, प्रकाश राज, मालविका अविनाश, श्रीनिधी शेट्टी आणि इतर कलाकार आहेत.