माझ्या अंत्ययात्रेला ये...! अंतिम इच्छा व्यक्त करत अभिनेता यशच्या चाहत्याने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2021 14:43 IST2021-02-19T14:42:38+5:302021-02-19T14:43:39+5:30
आत्महत्येपूर्वी रामकृष्णाने एक पानांची सुसाईड नोट लिहिली होती. कन्नड भाषेतील या सुसाईड नोटमध्ये त्याने त्याची अंतिम इच्छा लिहिली होती.

माझ्या अंत्ययात्रेला ये...! अंतिम इच्छा व्यक्त करत अभिनेता यशच्या चाहत्याने केली आत्महत्या
‘केजीएफ’ सुपरस्टार यश याच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. यशच्या एका चाहत्याने आत्महत्या करत मृत्यूला कवटाळले. 25 वर्षांचा हा चाहता कर्नाटकचा राहणार आहे. रामकृष्णा असे त्याचे नाव आहे. तो यशचा खूप मोठा चाहता होता. इतका की, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने यशचा उल्लेख केला आहे.
आत्महत्येपूर्वी रामकृष्णाने एक पानांची सुसाईड नोट लिहिली होती. कन्नड भाषेतील या सुसाईड नोटमध्ये त्याने त्याची अंतिम इच्छा लिहिली होती. आपल्या अंत्यसंस्काराला सिद्धारमैया आणि अभिनेता यशने यावे असे त्याने लिहिले होते. ना मी एक चांगला मुलगा बनू शकलो, ना चांगला भाऊ... मी प्रेमातही अपयशी ठरलो. आता आयुष्यात मिळवण्यासारखे काहीही उरले नाही. त्यामुळे मी आत्महत्या करतोय, असे त्याने लिहिले होते.
याघटनेबद्दल कळल्यानंतर सिद्धारमैय्या रामकृष्णाच्या गावी पोहोचले. त्याच्या अंत्ययात्रेत ते सहभागी झाले.
यशने ट्विटर वर व्यक्त केले दु:ख, केले आवाहन
अभिनेता यश रामाकृष्णाची अंतिम इच्छा पूर्ण करू शकला नाही. मात्र त्याने ट्विटरवर या चाहत्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला. आम्ही कलाकार तुम्हा चाहत्यांच्या शिट्या, टाळ्या व प्रेमाच्या प्रतीक्षेत असतो. माझ्या चाहत्यांकडून मी अशा पद्धतीने आयुष्य संपवण्याची अपेक्षा मात्र करत नाही, असे त्याने लिहिले आहे.