KGF स्टार यश आहे साऊथचा सर्वात महागडा अभिनेता; एकेकाळी वडील चालवायचे बस

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 03:41 PM2022-03-31T15:41:23+5:302022-03-31T15:42:30+5:30

Yash: यश हा दाक्षिणात्य कलाविश्वातील सर्वात महागडा अभिनेता म्हणून ओळखला जातो.

kgf star yash personal life career struggle fees shocking facts | KGF स्टार यश आहे साऊथचा सर्वात महागडा अभिनेता; एकेकाळी वडील चालवायचे बस

KGF स्टार यश आहे साऊथचा सर्वात महागडा अभिनेता; एकेकाळी वडील चालवायचे बस

googlenewsNext

सध्या कलाविश्वात दाक्षिणात्य चित्रपट आणि साऊथ स्टारची चलती असल्याचं दिसून येत आहे. पुष्पा, RRR असे कितीतरी चित्रपट बॉलिवूड चित्रपटांवर भारी पडत आहेत. त्यामुळे सध्या बॉलिवूड स्टारपेक्षा साऊथ स्टारची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. यामध्येच KGF फेम सुपरस्टार यश याच्या लोकप्रियतेविषयी आणि त्याच्या अभिनयाविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. परंतु, त्याच्या पर्सनल लाइफविषयी फार कमी जणांना माहित आहे. यश एका सर्व सामान्य बस ड्रायव्हरचा लेक असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे तो सध्या चर्चेत आहे.

KGF चॅप्टर 1 बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. त्यामुळे या चित्रपटाची लोकप्रियता पाहता त्याचा दुसरा भागही येत्या १४ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे सध्या यश चर्चेत येत आहे. यात त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफही चर्चेत आली आहे.

यश हा दाक्षिणात्य कलाविश्वातील सर्वात महागडा अभिनेता म्हणून ओळखला जातो. विशेष म्हणजे तो एका चित्रपटासाठी जवळपास १५ कोटी रुपये मानधन घेतो. परंतु, सर्वात महागडा अभिनेता म्हणून ओळखला जाणारा यश एका सामान्य कुटुंबातून आला आहे. कर्नाटकमधील हसन जिल्ह्यातील Boovanahalli या गावात यश लहानाचा मोठा झाला. त्याचे वडील बस ड्रायव्हर म्हणून काम करत होते.मात्र, जिद्द आणि मेहनत यांच्या जोरावर यशने कलाविश्वात त्याचं नाव निर्माण केलं.

दरम्यान,यशने २००५ मध्ये Nanda Gokula या मालिकेतून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर तो Malebillu, muktha, Preeti Illada Mele अशा अनेक कार्यक्रमात तो झळकला. त्यानंतर Modalasala या चित्रपटातून त्याने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. यशने लकी, जानू, ड्रामा, गुगली, Mr. and Mrs. Ramachari, मास्टरपीस या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Web Title: kgf star yash personal life career struggle fees shocking facts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.