KGF स्टार यशने 'रामायण'मध्ये रावणाची भूमिका साकारण्यास दिला नकार, कारण....
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 15:28 IST2023-06-12T15:19:16+5:302023-06-12T15:28:16+5:30
यश सुरुवातीला ही भूमिका करण्यास खूप उत्सुक होता, पण नंतर त्याने नकार दिला.

KGF स्टार यशने 'रामायण'मध्ये रावणाची भूमिका साकारण्यास दिला नकार, कारण....
केजीएफ स्टार यश कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आहे. या अभिनेत्याच्या 'केजीएफ' या पॅन इंडिया चित्रपटाने कमाईचे रेकॉर्ड तोडले. यशने बॉलिवूड चित्रपटाची ऑफर नाकारली आहे. रामायणावर आधारित नितेश तिवारीच्या चित्रपटात 'रावण'ची भूमिका साकारण्यास अभिनेत्याने स्पष्ट नकार दिला आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, यश सुरुवातीला ही भूमिका करण्यास खूप उत्सुक होता. रामाची भूमिका साकारण्यापेक्षा रावणाची भूमिका साकारणे त्याच्यासाठी आव्हानात्मक आहे. रामाच्या भूमिकेसाठी रणबीर कपूरला कास्ट करण्यात आल्याने यश आणखीनच उत्सुक होता. पण नंतर त्याच्या टीमने त्याला असे न करण्याचा सल्ला दिला. यशने नकारात्मक भूमिका करणं त्याच्या चाहत्यांना फारसे आवडणार नसल्याचं म्हटलं जातंय.
नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या मोठ्या प्रोजेक्टमध्ये बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला भगवान श्री रामची भूमिका ऑफर करण्यात आली आहे. त्याचवेळी सीतेच्या भूमिकेसाठी आलिया भटचे नाव समोर आले आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट या रिअल लाइफ कपलने यापूर्वी अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात स्क्रिन शेअर केली आहे. हा चित्रपट सुपर-डुपर हिट ठरला.