'खलनायक 2'मध्ये दिसणार नाही संजय दत्त?, सुभाष घई यांनी चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल दिली अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 16:03 IST2023-08-25T16:00:07+5:302023-08-25T16:03:14+5:30
खलनायकमधील बल्लूची भूमिका संजयने अफलातून साकारली आहे. आजही खलनायक म्हटलं की, लोकांना संजय दत्तची ही भूमिका आठवते.

'खलनायक 2'मध्ये दिसणार नाही संजय दत्त?, सुभाष घई यांनी चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल दिली अपडेट
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त(Sanjay Dutt)ने कधी रोमँटिक हिरो तर कधी डॅशिंग हिरो वा खलनायकाची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. सुभाष घई यांच्या ‘खलनायक’ चित्रपटाने संजय दत्तचं करिअर एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. हा सिनेमा प्रचंड गाजला होता. नायक नहीं खलनायक हूं मैं हे या सिनेमातील गाणं विशेष लोकप्रिय झालं. संजय दत्त, माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ हे त्रिकूट असलेला चित्रपट एवढा गाजेल असे कोणालाच वाटले नव्हते. संपूर्ण श्रेय हे कथानक, आणि या तिघांचा अभिनय यांना जाते. या सिनेमाला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. यादरम्यान आता अशी चर्चा सुरु आहे की खलनायकचा सिक्वल येतोय.
दिग्दर्शक सुभाष घई यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले, 'मीडियाच्या एका विभागात वृत्त दिल्याप्रमाणे, मी स्पष्ट करू इच्छितो की मुक्ता आर्ट्सने खलनायक 2 साठी कोणत्याही अभिनेत्याला साईन केलेले नाही. आम्ही याच्या स्क्रिप्टवर काम करत आहोत. कोणतीही घाई न करता गेली ३ वर्षे चित्रपट.
या चित्रपटाला 6 ऑगस्टला 30 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, निर्माते 5 सप्टेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत. एका मुलाखती दरम्यान चित्रपट दिग्दर्शक सुभाष घई यांनी खुलासा केला की, चित्रपटाचा प्रीमियर देखील 4 सप्टेंबर रोजी होणार आहे. या चित्रपटातील 'चोली के पीचे क्या है' हे लोकप्रिय गाणे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. माधुरी दीक्षितचा धमाकेदार परफॉर्मन्स आणि गाण्याचे आकर्षक बीट्स आजही ठेका धरायला लावतात.
खलनायक हा दिग्दर्शक सुभाष घई यांच्या करिअरमधील फार महत्वाचा सिनेमा. यातील बल्लूची भूमिका संजयने अफलातून साकारली आहे. आजही खलनायक म्हटलं की, लोकांना संजय दत्तची ही भूमिका आठवते. आता खलनायकच्या सीक्वलमध्ये तो दिसणार की नाही हे आपल्याला लवकरच कळेल.