'सेक्स' विषयावर चर्चा करणार सोनाक्षी, चक्क ट्विटरवर शेअर केला फोन नंबर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 11:17 AM2019-07-26T11:17:10+5:302019-07-26T11:17:39+5:30
सोनाक्षी सिन्हा प्रथमच ‘खानदानी शफाखाना’ या सेक्स कॉमेडी सिनेमात दिसणार आहे.
आपल्याकडे आजही काही गोष्टींवर उघडपणे बोलले जात नाही. अनेक विषय आहेत त्यात प्रत्येकवेळी बोलताना विचार करूनच बोलले पाहिजे असा काही समज बनला आहे. त्यापैकी एक विषय म्हणजे सेक्स यावर तर आपल्याकडे कधीच मोकळेपणाने बोलले जातच नाही. मात्र यासाठी एक अभिनेत्री अपवाद ठरली आहे.
Don’t be KHAMOSH anymore... aji #BaatTohKaro !
— Baby Bedi (@sonakshisinha) July 24, 2019
अधिक जानकारी के लिये missed call करें +91 7069588444 पर। #KhandaaniShafakhana.@varunsharma90@annukapoor_@Its_Badshah@Priyanshjora@shilpidasgupta_@MrigLamba@MahaveerJainMum@TSeriespic.twitter.com/cd6wtpYuJ5
ती अभिनेत्री म्हणजे बॉलीवूडची रज्जो अर्थात सोनाक्षी सिन्हा याविषयावर जनजागृती करण्यासाठी पुढे सरसावली आहे. होय, लवकरच सोनाक्षीचा सिनेमा ‘खानदानी शफाखाना’रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती एक सेक्स क्लिनिक चालवताना दिसणार आहे. काही सीन्समुळे हा सिनेमा वादाच्या भोव-यात अडकला आहे.
सध्या सोनाक्षी या सिनेमाचे जोरदार प्रमोशन करण्यात बिझी आहे. वेगवेगळे फंडे वापरत सिनेमाचे प्रमोशन करण्यात येत आहे. सिनेमाच्या प्रमोशनचा भाग म्हणून सोनाक्षीने चक्क एक आयडीयाची कल्पनाच लढवली आहे. सेक्स याविषयावर बोलण्यासाठी तिने चक्क तिचा फोन नंबरच सोशल मीडियावर शेअर केला आहे. सोनाक्षीची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे.
सोनाक्षी सिन्हा प्रथमच ‘खानदानी शफाखाना’ या सेक्स कॉमेडी सिनेमात दिसणार आहे. कौटुंबिक चित्रपट करणारी सोनाक्षी कायम सेक्स कॉमेडी चित्रपटांपासून स्वत:ला दूर ठेवत आलीय. त्यामुळेच ‘खानदानी शफाखाना’ हा चित्रपट तिने स्वीकारताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण अलीकडे एका ताज्या मुलाखतीत सोनाक्षीने हा चित्रपट स्वीकारण्यामागचे कारण सांगितले.
ती म्हणाली की, ‘सेक्स सारखा विषय आणि यावरचा चित्रपट मी कसा करेल, असा प्रश्न मला पडला होता. कारण मी आत्तापर्यंत केवळ आणि केवळ कौटुंबिक चित्रपट केले होते. मम्मी पापा काय म्हणतील, याचीही चिंता मला होती. पण मी स्क्रिप्ट वाचली आणि हा चित्रपट मी करायलाच हवा, असे मला वाटले. भारतात आजही सेक्स या विषयावर बोलताना लोक कचरतात. सर्दी-ताप आला तर तुम्ही डॉक्टरकडे जाता. पण सेक्सविषयक आजारांसाठी डॉक्टरकडे जाण्यात इतका संकोच का? असा प्रश्न मला पडला. या विषयावर जनजागृती करायची तर हा चित्रपट करायला हवा, असे मला वाटले.’