'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 15:25 IST2024-09-21T15:24:17+5:302024-09-21T15:25:09+5:30
बॉलिवूड सिनेमांमध्ये काम करणारा लोकप्रिय अभिनेता परवीन डबासचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आलीय (parveen dabas)

'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
'खोसला का घोसला' मधील अभिनेत्याचा भीषण अपघात झाल्याची मोठी घटना समोर आलीय. या अभिनेत्याचं नाव परवीन डबास असून तो बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता आहे. २१ सप्टेंबरला सकाळी हा भीषण अपघात झालाय. सध्या परवीनला वांद्रे येशील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून सध्या त्याच्यावर ICU त उपचार सुरु आहेत. परवीनची पत्नी 'मोहब्बते' सिनेमातील अभिनेत्री असून तिचं नाव प्रीती झंगियानी. परवीन लवकर बरा व्हावा म्हणून त्याचे चाहते प्रार्थना करत आहेत.
परवीनचा भीषण अपघात
प्रो पंजा लीगचं आयोजन करणाऱ्या परवीनच्या टीमने अधिकृत वक्तव्य जारी केलंय. त्यांनी लिहिलंय की, "आम्हाला सांगण्यास खूप दुःख होतंय की बॉलिवूड अभिनेता आणि प्रो पंजा लीगचे सह-संस्थापक परवीन डबास यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. शनिवारी सकाळी एका कार अपघातात परवीनचा भीषण दुखापत झाली. वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये परवीनला दाखल करण्यात आलं असून सध्या ICU मध्ये त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
परवीन डबास यांनी या सिनेमात केलंय काम
परवीन डबास यांनी बॉलिवूडच्या लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलंय. परवीन यांनी' खोसला का घोसला' सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. याशिवाय त्यांनी 'माय नेम इज खान' सिनेमात शाहरुख खानच्या भावाची भूमिका साकारली होती. 'मानसून वेडिंग', 'रागिनी एमएमएस २' अशा सिनेमांमध्ये परवीन यांनी काम केलंय. परवीन या अपघातातून लवकरात लवकर बरा होऊन पुन्हा कामात सक्रीय होईल, अशी त्याच्या चाहत्यांना आशा आहे.