श्रीदेवी यांची मुलगी खुशी शिक्षणासाठी झाली अमेरिकेला रवाना, कॉलेजची फी ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 06:00 AM2019-09-11T06:00:00+5:302019-09-11T06:00:02+5:30
खुशी आता पुढील शिक्षणासाठी दोन वर्षांसाठी अमेरिकेला रवाना झाली आहे.
श्रीदेवी यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलगा जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या धडक या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. आता जान्हवी लवकरच द कारगिल गर्ल, तख्त यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. जान्हवीनंतर तिची बहीण खुशी देखील बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याचे म्हटले जात होते. पण आता या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे असेच म्हणावे लागेल. कारण खुशी आता पुढील शिक्षणासाठी दोन वर्षांसाठी अमेरिकेला रवाना झाली आहे.
खुशी कपूरला नुकतेच तिचे वडील बोनी कपूर यांच्यासोबत विमानतळावर पाहाण्यात आले. तिला ते एअरपोर्टला सोडण्यासाठी आले होते. त्यांच्यासोबतच खुशीचे जवळचे मित्रमैत्रीण देखील होते. खुशीचा एअरपोर्टवरील हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खूशी आता न्यूयॉर्क फिल्म ॲकेडमीमध्ये अभिनयाचे धडे गिरवणार असून दोन वर्षं तिथेच राहाणार आहे.
न्यूयॉर्क फिल्म ॲकेडमी ही जगातील सगळ्यात प्रसिद्ध फिल्म ॲकेडमीमधील एक असून आजवर बॉलिवूडमधील अनेकांनी यात फिल्म मेकिंगचे, अभिनयाचे शिक्षण घेतले आहे. जागरणने दिलेल्या वृत्तानुसार, या ॲकेडमीमध्ये अभिनयात मास्टर्स करण्यासाठी केवळ एका सेमिस्टरची फी साडे 12 लाख रुपये आहे. या कोर्समध्ये एकूण चार सेमिस्टर असतात तर बॅचलर कोर्समध्ये एका सेमिस्टरसाठी 10 लाख रुपये इतकी फी असते आणि त्यात आठ सेमिस्टर असतात. फिल्म मेकिंगच्या कोर्ससाठी 25 लाख रुपये फी भरावी लागते.
खुशी कपूरने बॉलिवूडमध्ये एंट्री केली नसली तरी ती सोशल मीडियावर चांगलीच ॲक्टिव्ह असते. तिचे अनेक फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते आणि या फोटोंना तिचे फॅन्स नेहमीच प्रतिसाद देतात. तिला सोशल मीडियावर चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून ती अनेकवेळा सार्वजनिक ठिकाणी बहीण जान्हवीसोबत दिसते. तसेच तिचे बॉण्डिंग तिची सावत्र बहीण अंशुला आणि चुलत बहीण शनायासोबत देखील खूप चांगले असून तिच्या इन्स्टाग्रामला तिच्या बहिणींसोबतचे आणि वडिलांसोबतचे अनेक फोटो आपल्याला पाहायला मिळतात.