कियारा आडवाणी आणि कार्तिक आर्यन 'भुलभुलैया २'नंतर दिसणार या नव्या सिनेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 06:39 PM2022-08-26T18:39:19+5:302022-08-26T18:39:45+5:30

Kiara Advani And Kartik Aaryan: कियारा आडवाणी आणि कार्तिक आर्यनच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस करणार आहे.

Kiara Advani and Karthik Aaryan will be seen in this new movie after 'Bhulbhulaiyaa 2' | कियारा आडवाणी आणि कार्तिक आर्यन 'भुलभुलैया २'नंतर दिसणार या नव्या सिनेमात

कियारा आडवाणी आणि कार्तिक आर्यन 'भुलभुलैया २'नंतर दिसणार या नव्या सिनेमात

googlenewsNext

कियारा आडवाणी (Kiara Advani) आणि कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) नुकतेच हॉरर-कॉमेडी 'भूल भुलैया २' (Bhool bhulaiya 2) सुपर डुपर हिट चित्रपट ठरला. बॉलिवूडमध्ये असा ट्रेंड आहे की एकदा कोणाची जोडी हिट झाली की मग सर्वच निर्माते-दिग्दर्शकांना त्यांच्यासोबत काम करायचे असते. आता कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांनी मोठे हिट चित्रपट दिल्यामुळे, चित्रपट निर्माते त्यांना घेऊन नवीन सिनेमा बनवत आहेत. ते दोघे सत्यप्रेम की कथा चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट २९ जून, २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मराठमोळा दिग्दर्शक समीर विद्वांस करणार आहे.

कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी अभिनित नमाह पिक्चर्स, समीर विद्वांस दिग्दर्शित, साजिद नाडियादवालाचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सत्यप्रेम की कथा' २९ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. शूटिंगच्या सुरुवातीपासून हा चित्रपट सतत चर्चेत आहे. 'सत्यप्रेम की कथा' ही आगामी संगीतमय प्रेमकथा आहे ज्याची घोषणा झाल्यापासूनच चर्चेचा विषय बनली आहे. या चित्रपटाद्वारे कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी दुसऱ्यांदा एकमेकांसोबत पडद्यावर दिसणार आहेत. कियारा आणि कार्तिक हे आज इंडस्ट्रीतील स्क्रीनवरील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत, ज्यांना पडद्यावर एकत्र पाहणे चाहत्यांसाठी मोठी पर्वणी असते.

'सत्य प्रेम की कथा'देखील एनजीई आणि नमाह पिक्चर्स यांच्यातील मोठ्या सहकार्याचे प्रतीक आहे. विशेष म्हणजे, किशोर अरोरा आणि दिग्दर्शक समीर विद्वांस यांच्यासह साजिद नाडियाडवाला आणि शरीन मंत्री केडिया यांनी आपापल्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. सत्यप्रेम की कथा २९ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

Web Title: Kiara Advani and Karthik Aaryan will be seen in this new movie after 'Bhulbhulaiyaa 2'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.