Kiara Advani आणि Siddharth Malhotra जानेवारीत बांधणार लगीनगाठ?, जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 02:03 PM2022-11-30T14:03:32+5:302022-11-30T14:35:12+5:30
सिद्धार्थ मल्होत्रासोबत कियारा आडवाणी जानेवरीत लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे.
Kiara Advani Siddharth Malhotra January Wedding Truth: बॉलिवूड स्टार्स त्यांच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतात. त्यामुळे स्टार्सच्या पॅच-अप आणि ब्रेकअपच्या बातम्या सोशल मीडियावर येताच सगळीकडे धुमाकूळ घालताना दिसतात. सध्या सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) यांच्या अफेअरच्या बातम्या समोर येत आहेत. करणच्या कॉफी विथ करण(Koffee With Karan Show)च्या शोनंतर दोन्ही स्टार्सच्या लग्नाची बरीच चर्चा झाली होती.
विशेष म्हणजे कियारा अडवाणीने कन्फर्म केलं की ती आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबतचं नातं मैत्रीपेक्षा जास्त आहे. कियाराचा 'कबीर सिंग' चित्रपटाचा सहकलाकार शाहिद कपूरनेही हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचे संकेत दिले होते. तेव्हापासून कियारा आणि सिद्धार्थात जानेवारीत लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा सुरु झाली.
जानेवारीत लग्न करणार कियारा आणि सिद्धार्थ?
कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा जानेवारी 2023 मध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याचीही अफवा आहे. कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा जानेवारीत लग्न करणार नसल्याचे कन्फर्म झालं आहे.
कियारा अडवाणी वर्क फ्रंट
दोघेही सध्या आपापल्या आगामी सिनेमांमध्येच व्यस्त आहेत. त्यामुळे इतक्यात त्यांचा लग्नाचा प्लॅन नाही असे समजत आहे. दोघांना करिअर मध्ये यश मिळत आहे. त्यामुळे सध्ये ते आपल्या करिअर कडेच लक्ष देणार असल्याचं कळत आहे. त्यांच्या या निर्णयामुळे चाहते मात्र नक्कीच नाराज झाले आहेत. चाहत्यांना आता सिड किआरा च्या लग्नासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे.
कियारा लवकरच विकी कौशलसोबत 'गोविंदा नाम मेरा'मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट एक कॉमेडी थ्रिलर आहे जो डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीजसाठी तयार आहे. याशिवाय कियारा राम चरण-एस शंकर प्रोजेक्टद्वारे तेलुगु फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू करतेय.