कोण आहे कियाराची मावशी?, वयाच्या 19 व्या वर्षी जिच्यावर जडलं होते सलमान खानचं प्रेम, का तुटलं होतं नातं?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 05:36 PM2023-04-24T17:36:58+5:302023-04-24T17:39:00+5:30
संगिता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ या अभिनेत्रींसोबत असलेल्या अफेअरची तर तुफान चर्चा रंगली. प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येतो की त्याची पहिली गर्लफ्रेंड कोण होती?
बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) त्याच्या चित्रपटांसोबतच पर्सनल लाइफमुळेही कायम चर्चेत असतो. यात खासकरुन त्याची लव्हलाइफ जास्त चर्चिली जाते. वयाची ५० पार करणाऱ्या सलमानचं नाव आजवर अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. यात संगिता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ या अभिनेत्रींसोबत असलेल्या अफेअरची तर तुफान चर्चा रंगली. प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न येतो की त्याची पहिली गर्लफ्रेंड कोण होती? मीडिया रिपोर्ट्सनुसार, बॉलिवूड सुपरस्टारची पहिली गर्लफ्रेंड शाहीन जाफरी होती, ती दिग्गज अभिनेता अशोक कुमारची नात आणि बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणीची मावशी होती. असे म्हटले जाते की, सलमानला शाहीन जाफरी इतका आवडला होती की त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांची शाहीनशी ओळख करून दिली होती.
मुंबईतील सेंट झेविअर्स कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षात शिकत असताना सलमान आणि शाहीनची पहिली भेट झाली होती. त्यावेळी शाहीन बानू, शाहीन जाफरी या नावाने ओळखली जायची. अभिनेत्री कियारा आडवाणीच्या आईने जेनेवीव आडवाणीने सलमान आणि शाहीनची भेट घडवून आणली होती. सलमान त्याच्या कॉलेजबाहेर तासनतास शाहीनची वाट पाहत उभा असायचा. रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं जातं की, सलमानच्या कुटुंबीयांनाही शाहीन खूप आवडू लागली होती, त्यांना तिला आपल्या घरची सून बनवायची होती, पण अचानक असं घडलं ज्याची कुणालाही अपेक्षा नव्हती.
रिपोर्ट्सनुसार, हीच वेळ होती जेव्हा संगीता बिजलानी सलमान खान आणि शाहीनच्या आयुष्यात आली होती. संगीताच्या आगमनाने सलमानचे शाहीनशी असलेले नातं संपलं आणि नंतर दोघांचे ब्रेकअप झाले. जेव्हा 1980 मध्ये मिस इंडिया झालेल्या संगीता बिजलानीचे बॉयफ्रेंड बिंजू अलीसोबत ब्रेकअप झाले होते.संगीता जेव्हा सलमानला भेटली तेव्हा त्यांचं ब्रेकअप झालं होतं असं म्हटलं जातं. सलमान ज्या हेल्थ क्लबमध्ये जायचा त्याच हेल्थ क्लबमध्ये ती जात असे. इथेच त्यांची भेट झाली होती.