भारीच...! कियारा आडवाणीने खरेदी केली नवी कोरी Audi कार, किंमत वाचून व्हाल अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 05:49 PM2021-12-15T17:49:22+5:302021-12-15T17:50:02+5:30

कियारा आडवाणी(Kiara advani)च्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये आणखी एका नव्या कोऱ्या कारचा समावेश झाला आहे.

Kiara advani bought audi a8l luxury sedan costs more than 1 crore rupees | भारीच...! कियारा आडवाणीने खरेदी केली नवी कोरी Audi कार, किंमत वाचून व्हाल अवाक्

भारीच...! कियारा आडवाणीने खरेदी केली नवी कोरी Audi कार, किंमत वाचून व्हाल अवाक्

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी(Kiara advani)ने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. कबीर सिंग (kabir singh)चित्रपटानंतर नुकताच तिचा शेरशाह चित्रपट रिलीज झाला. यात तिने डिंपलची भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक झाले. कियारा आडवाणी(Kiara advani)ने २०१४ साली 'फगली' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. जरी पहिल्या चित्रपटातून तिला फारशी लोकप्रियता मिळाली नाही. २०१६ मध्ये सुशांत सिंग राजपूतसोबत 'एमएस धोनी'ःद अनटोल्ड स्टोरी'मध्ये तिने साक्षी रावत ही भूमिका साकारली होती.

यशाचा आलेख वेगाने सर करणाऱ्या कियाराने (Kiara advani) नुकतीच एक ब्रँड न्यू कार खरेदी केली आहे.त्यामुळे तिच्या गाड्यांच्या ताफ्यामध्ये आणखी एका नव्या कोऱ्या कारचा समावेश झाला आहे कियाराने Audi A8L luxury Sedan विकत घेतली आहे. कंपनीने कियाराचे फोटो शेअर केले आहेत ज्यात अभिनेत्री तिच्या ब्रँ़ न्यू ऑडीसोबत दिसते आहे. या आलिशान ऑडी एडिशनची किंमत 1.58 कोटी रुपये आहे.

ऑडीचे हे एडिशन गेल्या वर्षी 2020 मध्ये भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आली होती. त्याची सुरुवातीची किंमत 1.56 कोटी (एक्स-शोरूम) आहे. कियाराने तिची नवीन Audi A8L 1.58 कोटी रुपयांच्या किमतीत घरी आणली आहे. कार कंपनीने फोटो ट्विट केले आहेत. 

कियाराचे कार कलेक्शन
कियाराची ही तिसरी सर्वात महागडी कार आहे. त्याच्या लक्झरी कार कलेक्शनमध्ये BMW X5 आणि Mercedes-Benz E-Class, BMW 530d यांचा समावेश आहे. तिच्या सर्व कार महागड्या आहेत. कियारापूर्वी करण जोहरने ऑगस्टमध्ये ऑडी A8L देखील खरेदी केली होती. आता हे दोन्ही सेलिब्रिटी ऑडीच्या या नवीन एडिशनचे मालक बनले आहेत.


कियारा आडवाणीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर आता ती राज मेहता यांच्या जुग जुग जिओ सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटात वरूण धवन, अनिल कपूर, नीतू कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Web Title: Kiara advani bought audi a8l luxury sedan costs more than 1 crore rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.