'ज्याच्यासोबत व्हॅकेशनला गेली होती, त्याला करतेय डेट', कियारा आडवाणीने रिलेशनशीपबद्दल केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2021 12:21 IST2021-03-18T12:20:42+5:302021-03-18T12:21:09+5:30
बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणीने एका मुलाखतीदरम्यान ती डेट करत असलेल्या व्यक्तीबद्दल सांगितले.

'ज्याच्यासोबत व्हॅकेशनला गेली होती, त्याला करतेय डेट', कियारा आडवाणीने रिलेशनशीपबद्दल केला खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणीने सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. नेहमी ती कथित बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्रासोबत स्पॉट होते. मात्र त्या दोघांनी कधीच त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला नाही मात्र या दोघांमधील जवळीक देखील वाढताना दिसते आहे. दोघे एकत्र व्हॅकेशन आणि डिनर डेटला जाताना दिसतात.
नुकतेच कियारा आडवाणी फिल्मफेअरच्या मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकली होती आणि मुलाखतीदरम्यान तिने डेटिंगचा खुलासा केला. तिला विचारण्यात आले होते की शेवटचे तिने कोणाला डेट केले आहे. त्यावर कियाराने उत्तर दिले की, शेवटची मी जेव्हा डेटवर गेली होती. त्याच्यासोबत काही काळासाठी मी यावर्षी गेले होते. आणि यावर्षासाठी फक्त दोन महिने, आता तुम्ही गणित करा.
कियाराने सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या नात्याबद्दल सांगितले का? यावर्षी कियारा मालदीव व्हॅकेशनवर सिद्धार्थ मल्होत्रासोबत गेली होती आणि ती नुकतीच सिद्धार्थच्या कुटुंबालाही भेटली होती.
यासोबत कियाराने जर तिच्या बॉयफ्रेंडने तिला फसविले तर ती काय करेल, याबद्दल सांगितले. त्यावर ती म्हणाली की, तेव्हा मी त्याला ब्लॉक करेन आणि कधीच मागे वळून पाहणार नाही. कधीच नाही विसरणार. मला परत जायचे नाही. एक रिलेशनशीपमध्ये पूर्णपणे नाही आणि फक्त नाही होणार.
वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर कियारा शेवटची इंदू की जवानीमध्ये दिसली होती. ती शेरशाहमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. याशिवाय कियारा सध्या जुग जुग जियोचे शूटिंग करते आहे. यात ती वरूण धवनसोबत दिसणार आहे.