स्वत:ची छत्री सुद्धा धरता येत नाही का? भरपावसात सिक्युरिटी गार्डला छत्री धरायला लावणारी कियारा ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 05:10 PM2022-08-18T17:10:09+5:302022-08-18T17:11:06+5:30
Kiara Advani: कियाराला पावसापासून वाचवण्यासाठी हा गार्ड स्वत: भिजत होता हे पाहून नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरलं आहे.
सौंदर्य आणि दमदार अभिनयशैली यांच्यामुळे कायम चर्चेत येत असलेली अभिनेत्री म्हणजे कियारा आडवाणी (Kiara Advani). गेल्या काही दिवसांपासून कियारा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रामुळे चर्चेत येत आहे. सोशल मीडियावर या दोघांच्या अफेअरच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. मात्र, या प्रकरणी अद्याप दोन्ही कलाकारांनी मौन बाळगलं आहे. सध्या कियारा एका व्हिडीओमुळे चर्चेत येत आहे. चर्चेत येण्यापेक्षा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
सोशल मीडियावर कियाराचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भरपावसात सिक्युरिटी गार्डला आपल्या डोक्यावर छत्री धरायला लावल्यामुळे कियारा ट्रोल झाली आहे. कियाराला पावसापासून वाचवण्यासाठी हा गार्ड स्वत: भिजत होता हे पाहून नेटकऱ्यांनी तिला धारेवर धरलं आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये?
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कियारा तिच्या कारमधून उतरत असताना पाऊस सुरु झाला. ज्यामुळे एक सिक्युरिटी गार्ड धावत तिच्याजवळ छत्री घेऊन आला. इतकंच नाही तर तिला पावसापासून वाचवण्यासाठी तो स्वत: मात्र भिजत होता. हे पाहून नेटकरी नाराज झाले.
काय म्हणाले नेटकरी?
'हे लोक स्वत:ची छत्री स्वत: का पकडू शकत नाहीत?', असा प्रश्न एका नेटकऱ्याने विचारला आहे. तर,'बिचारा हिच्यासाठी पावसात भिजतोय त्याचं हिला काहीच नाही', 'जर सिक्युरिटी गार्डऐवजी स्वत:ची छत्री स्वत: पकडली असती तर चालताना एवढी अनकम्फर्टेबल झाली नसती', अशा कितीतरी कमेंट करत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, कियारा ट्रोल होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा ती तिच्या कपड्यांवरुनही ट्रोल झाली आहे. अलिकडेच तिचा 'जुग जुग जीयो', 'भूल भुलैया 2', 'शेरशाह' हे काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.