कियारा अडवाणीला लाइफ पार्टनरमध्ये हवे आहेत इतके सारे गुण, खरंच कुठे मिळेल असा मुलगा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 16:07 IST2020-10-20T15:38:13+5:302020-10-20T16:07:57+5:30
कियाराची फॅन फॉलोईंग अलिकडे फारच वाढली आहे. ती लवकरच अक्षय कुमारसोबत 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमात दिसणार आहे. अशात कियाराने तिला तिच्या परफेक्ट मॅनमध्ये काय काय गुण हवेत याचा खुलासा केला आहे.

कियारा अडवाणीला लाइफ पार्टनरमध्ये हवे आहेत इतके सारे गुण, खरंच कुठे मिळेल असा मुलगा?
'कबीर सिंग' सिनेमापासून चाहत्यांच्या मनात घर करून असलेली कियारा अडवाणी सध्या बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. कियाराची फॅन फॉलोईंग अलिकडे फारच वाढली आहे. ती लवकरच अक्षय कुमारसोबत 'लक्ष्मी बॉम्ब' सिनेमात दिसणार आहे. अशात कियाराने तिला तिच्या परफेक्ट मॅनमध्ये काय काय गुण हवेत याचा खुलासा केला आहे. कियाराने एका चॅट शोमध्ये तिच्या परफेक्ट मॅनबाबत सांगितलं आहे. तशी तिची लिस्ट फारच मोठी आहे. तिने सांगितले की, तिला हृतिक रोशन, अक्षय कुमार, फरहान अख्तर आणि आयुष्मान खुराणा यांचं मिश्रण असलेला पार्टनर हवाय.
कियाराने नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये सांगितलं की, तिच्या पार्टनरमध्ये काय काय गुण असले पाहिजे. ती म्हणाली की, त्याच्यात जेनिफर लॉरेन्सारखा हजरजबाबीपणा असला पाहिजे. तो दिसायला हृतिक रोशनसारखा असावा आणि त्याचा डिसिप्लीन-स्टॅमिना अक्षय कुमारसारखा असावा. इतकेच नाही तर कियाराने आणखीही अनेक गोष्टी सांगितल्या. (कियारा आडवाणीने चाहत्यांना केले क्लीन बोल्ड, तिच्या नवीन फोटोंनी वेधले लक्ष)
अंबानीएवढा पैसा असावा
कियाराने हेही सांगितलं की, तिचा पार्टनर श्रीमंत असावा. नुसताच श्रीमंत नसावा तर त्याच्याकडे अंबानीं इतका पैसा असावा. आणि सोबतच फरहान अख्तर व आयुष्मान खुराणासारखं टॅलेंटही त्याच्यात असावं. (ना कियारा ना अनुष्का प्रभासच्या 'आदिपुरूष' मध्ये क्रिती सेनन करणार सीतेची भूमिका?)
कियाराने सांगितल्या खाण्याच्या आवडी-निवडी
कियाराने आपल्या खाण्या-पिण्याच्या आवडी-निवडीबाबतही या शोमध्ये सांगितलं. ती म्हणाली की, तिच्या जेवणात भेंडी, भोपळा आणि सॅलमन फिश रोज असते. मला नाही वाटत की, कुणीही भेंडीसोबत सॅलमन फिश खाऊ शकेल. इतकेच काय माझ्या आईलाही हे विचित्र वाटतं. पण ही मी तयार केलेली खास डिश आहे. जी मला फार आवडते.
रेस्टॉरन्टमध्ये लपून भेंडी घेऊन जाते
कियाराने सांगितले की, ती अनेकदा वांद्र्यातील रेस्टॉरन्टमध्ये भेंडी लपवून घेऊन जाते. जेवण वेळेवर मिळालं नाही तर राग बाहेर दिसू लागतो. कियाराने आणखी एक विचित्र गोष्ट सांगितली. ती म्हणाली की, 'मला १२ वाजता भूक लागते. पण लंच ब्रेक साधारण दीड ते अडीच दरम्यान होतो. यावेळी ती लपून व्हॅनिटी व्हॅनमध्ये जेवण करते'.