कसा शूट झाला ‘तो’ सर्वाधिक वादग्रस्त सीन? कियारा अडवाणीने दिले उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2018 11:42 AM2018-07-20T11:42:35+5:302018-07-20T11:44:03+5:30
अभिनेत्री कियारा अडवाणी अलीकडे ‘लस्ट स्टोरिज’ या वेबसीरिजमध्ये दिसली. या वेबसीरिजमधील कियाराच्या भूमिकेची बरीच चर्चा झाली. याचे एक कारण म्हणजे, तिच्यावर चित्रीत यातील एक वादग्रस्त सीन.
अभिनेत्री कियारा अडवाणी अलीकडे ‘लस्ट स्टोरिज’ या वेबसीरिजमध्ये दिसली. या वेबसीरिजमधील कियाराच्या भूमिकेची बरीच चर्चा झाली. याचे एक कारण म्हणजे, तिच्यावर चित्रीत यातील एक वादग्रस्त सीन. होय, यातील कियाराच्या हस्तमैथुनाच्या दृश्याने खळबळ उडवून दिली होती. आधीअभिनेत्री स्वरा भास्करचा ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटातील हस्तमैथुनाचा सीन वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. तो वाद शमत नाही, तोच ‘लस्ट स्टोरीज’मधील कियारा अडवाणीच्या हस्तमैथुनाच्या दृश्याने खळबळ उडवून दिली होती. या दृश्यावेळी ‘कभी खुशी कभी गम’ हे गाणे वापरण्यात आल्याने मंगेशकर कुटुंबीयांच्या भावना दुखावल्याचीही बातमी आली होती. एकंदर काय तर या दृश्यामुळे कियाराची बरीच चर्चा झाली होती.
ताज्या मुलाखतीत कियाराला या वादग्रस्त सीनबद्दल विचारण्यात आले आणि तिने अगदी मोकळेपणाने या प्रश्नाचे उत्तर दिले. हा सीन करताना तुझ्या डोक्यात काय सुरु होते, असा प्रश्न तिला केला गेला. यावर ती म्हणाली की, ‘असा सीन आहे, हे कळल्यापासून तर तो सीन शूट होईपर्यंत माझ्या मनात बरेच काही सुरू होते. करण जोहरने मला या सीनबद्दल माहिती दिली होती. यासाठी काही वर्कशॉप वगैरेची गरज पडेल का, असे मी करणला विचारले होते. पण तू ये, शूट कर अन् आनंद घे, केवळ एवढेच तो मला म्हणाला. हा सीन शूट करण्यापूर्वी मी केवळ गुगलवर सर्च केले होते. वायब्रेटर कसे काम करतो आणि याचे काही व्हिडिओ तेवढे मी पाहिले होते. आम्ही या सीनसाठी कुठलीही तयारी केली नव्हती. कारण हा सीन अधिकाधिक जिवंत करण्यावर आमचा भर होता. हा सीन केल्यानंतर मला कळले की, जितकी रिहर्सल तुम्ही कराल, तेवढेच काम कंटाळवाणे होईल.’
कोणती दृश्ये करायला तुझी ना असेल? या प्रश्नाचेही तिने उत्तर दिले. इंटिमेट सीन्स कथेची गरज असेल तर मी ते नक्की करेल. पण ते देताना मर्यादा लांघली जाणार नाही, याबाबत मी दक्ष असेल. जिथे गरज नाही आणि केवळ इफेक्टसाठी असे सीन्स करण्यासाठी कुणी मला सांगत असेल तर मी ते सीन्स अजिबात करणार नाही, असे कियारा म्हणाली.