बाबो..! लग्नाआधीच कियारा आडवाणीला व्हायचंय प्रेग्नेंट, कारण वाचून व्हाल हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2020 14:18 IST2020-11-03T14:17:18+5:302020-11-03T14:18:14+5:30
कियारा आडवाणीने गुड न्यूज चित्रपटात प्रेग्नेंट महिलेची भूमिका साकारली होती.

बाबो..! लग्नाआधीच कियारा आडवाणीला व्हायचंय प्रेग्नेंट, कारण वाचून व्हाल हैराण
कबीर सिंग चित्रपटातून घराघरात पोहचलेली अभिनेत्री कियारा आडवाणी एकानंतर एक सुपरहिट चित्रपट देते आहे. लवकरच कियारा लक्ष्मी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटामुळे ती चर्चेत आहे. मागील वर्षी ती अक्षय कुमारसोबतगुड न्यूज चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाचे त्यांनी जोरदार प्रमोशन केले होते.
आता ती लक्ष्मी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. गुड न्यूज चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान कियारा बऱ्याच प्लॅटफॉर्मवर झळकली होती. त्यावेळी तिला विचारलेल्या एका प्रश्नाचा खुलासा केला होता की ती तिला प्रेग्नेंट व्हायचे आहे कारण सर्व गोष्टी खाऊ शकेन. खरेतर करीना एका मुलाची आई त्यादरम्यान झाली होती. करीनाला दुसऱ्या मुलाबाबत विचारले होते.
त्यावेळी करीना म्हणाली होती की, आता तिला दुसरे मुल नको आहे. पुढे बेबोला विचारले की, पहिल्या मुलावेळी काय काय खाण्याची इच्छा व्हायची. त्यावर करीना म्हणाली की, तिने लाडू खूप खाल्ले होते. तेव्हा हाच प्रश्न कियाराला केला की तू कधी लाडू खाल्ले आहेस का. त्यावर कियारा म्हणाली की, मी अजून आई झाली नाही तर लाडू कसे खाणार.
पुढे कियारा म्हणाली होती की, मला प्रेग्नेंट व्हायचे आहे म्हणजे हे सगळे खाऊ शकते. कियारचे हे उत्तर ऐकून तिथे उपस्थित असलेले अक्षय कुमार, करीना आणि दलजीत दोसांझसोबत इतर लोक खूप हसले होते.