सेक्स टॉयबद्दल कियारा आडवाणी होती अनभिज्ञ, 'लस्ट स्टोरीज'मधील बोल्ड सीनसाठी इथून घेतले होते धडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 16:07 IST2020-06-16T16:06:43+5:302020-06-16T16:07:20+5:30
कियाराला लस्ट स्टोरीजमुळे लोकप्रियता मिळाली. या वेबसीरिजमध्ये तिने बोल्ड भूमिका केली होती. ही भूमिका साकारण्याच्या आधी कियारा खूप नर्व्हस होती.

सेक्स टॉयबद्दल कियारा आडवाणी होती अनभिज्ञ, 'लस्ट स्टोरीज'मधील बोल्ड सीनसाठी इथून घेतले होते धडे
कियारा आडवाणीने बॉलिवूडमध्ये अल्पावधीतच आपलं स्थान निर्माण केले आहे. तिला बॉलिवूडमध्ये खरी ओळख लस्ट स्टोरीजमुळे मिळाली. या वेबसीरिजमध्ये तिने बोल्ड भूमिका केली होती. ही भूमिका साकारण्याच्या आधी कियारा खूप नर्व्हस होती आणि तिने सेक्स टॉयजबद्दल जाणून घेण्यासाठी गुगलची मदत घेतली होती.
2018 साली ओटीटी प्लॅटफॉर्मवर चार छोट्या स्टोरीजमध्ये लस्ट स्टोरीज ही सीरिज रिलीज केली होती. ही सीरिज प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरली होती. यातील एका स्टोरीचे दिग्दर्शन करण जोहरने केले होते आणि यात कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत होती. यात कियारा खूपच बोल्ड दाखवली होती आणि कियारानेदेखील अगदी सहजतेने ही भूमिका साकारली होती.
कियारा म्हणाली की, 'हा इंटिमेट सीन करताना आधी ती खूप नर्व्हस होती. हा सीन करण्यासाठी करण जोहर कित्येक पद्धती सांगितल्या. मी न घाबरता हे सीन करावेत असे करणचे मत होते'. कियारा म्हणाली की 'करण जोहरने तिला हे सीन खूप जास्त दाखवले जाणार नाहीत.'
कियारा पुढे म्हणाली की, 'हा सीन चित्रीत करताना मी हसावं असे करण जोहरला हवे होते. या सीनसाठी मी गुगलची देखील मदत घेतली होती. इतकेच नाही तर द अगली ट्रुथ हा सिनेमादेखील पाहिला. लस्ट स्टोरीजमध्ये कियाराने अभिनेता विकी कौशलच्या पत्नीची भूमिका साकारली होती.'
कियारा आडवाणी शेवटची गुड न्यूज या चित्रपटात पहायला मिळाली. या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतूक झाले होते.