'लस्ट स्टोरीज'मधील बोल्ड सीनसाठी कियाराला कुणी दिले होते धडे, वाचून तुम्हाला बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 16:26 IST2019-06-18T16:26:00+5:302019-06-18T16:26:38+5:30
अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या तिच्या आगामी चित्रपट 'कबीर सिंग'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

'लस्ट स्टोरीज'मधील बोल्ड सीनसाठी कियाराला कुणी दिले होते धडे, वाचून तुम्हाला बसेल धक्का
अभिनेत्री कियारा आडवाणी सध्या तिच्या आगामी चित्रपट 'कबीर सिंग'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शाहिद कपूर मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत ती प्रमोशनल मुलाखतीत भाग घेत असते. नुकतेच त्या दोघांनी नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी कियाराने बरेच खुलासे केले.
नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये कियारा आडवाणीची शॉर्ट फिल्म 'लस्ट स्टोरिज'ची देखील चर्चा झाली. खरंतर या स्टोरीमधील कियारावर चित्रीत केलेला इंटिमेट सीन खूप चर्चेत आला होतो. नेहाच्या या शोमध्ये देखील या सीनवर चर्चा झाली. यावेळी कियाराने हा सीन कसा चित्रीत केला हे सांगितले.
कियारा म्हणाली की, 'हा इंटिमेट सीन करताना आधी ती खूप नर्व्हस होती. हा सीन करण्यासाठी करण जोहर कित्येक पद्धती सांगितल्या. मी न घाबरता हे सीन करावेत असे करणचे मत होते'. कियारा म्हणाली की 'करण जोहरने तिला हे सीन खूप जास्त दाखवले जाणार नाहीत.'
कियारा पुढे म्हणाली की, 'हा सीन चित्रीत करताना मी हसावं असे करण जोहरला हवे होते. या सीनसाठी मी गुगलची देखील मदत घेतली होती. इतकेच नाही तर द अगली ट्रुथ हा सिनेमादेखील पाहिला. लस्ट स्टोरीजमध्ये कियाराने अभिनेता विकी कौशलच्या पत्नीची भूमिका साकारली होती.'
कियाराचा आगामी चित्रपट 'कबीर सिंग' तेलुगू चित्रपट 'अर्जुन रेड्डी'चा रिमेक आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डीने केले आहे. हा चित्रपट २१ जूनला प्रदर्शित होणारेय. या चित्रपटाव्यतिरिक्त कियारा लक्ष्मी बॉम्ब व गुड न्यूजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.