'ना मंगळसूत्र, ना अंगठी' कियाराचा लुक पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल; सोबत नाही तर वेगवेगळी एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 11:29 AM2023-02-26T11:29:59+5:302023-02-26T11:31:29+5:30
लग्नाला एक महिनाही पूर्ण होत नाही तोच कियाराच्या लुकवरुन तिला ट्रोल केले जात आहे.
बॉलिवूडमधलं चर्चेतलं कपल सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) अन् कियारा अडवाणी (Kiara Adwani) ७ फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकले. लग्नाला एक महिनाही पूर्ण होत नाही तोच कियाराच्या लुकवरुन तिला ट्रोल केले जात आहे. हे न्यूली मॅरिड कपल नुकतेच एका अवॉर्ड सोहळ्यात पोहोचले. तेही वेगवेगळे. यावेळी कियाराचा एकंदर लुक बघुन चाहते नाराज झाले आणि तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
कालच पार पडलेल्या एका अवॉर्ड सोहळ्यात सिद्धार्थ अन् कियारा सोबत नाही तर वेगवेगळे पोहोचले. मात्र अवॉर्ड सोहळ्यात ते एकमेकांसोबतच बसले होते. यावेळी कियाराला अवॉर्ड मिळाल्यानंतर स्वत: सिद्धार्थ स्टेजवर गेला आणि तिच्यासोबतच खाली उतरला. मात्र चाहत्यांना खटकलेली गोष्ट म्हणजे कियाराने यावेळी ना मंगळसूत्र घातले होते ना वेडिंग रिंग. हिरवी साडी त्यावर स्टायलिश ब्लाऊज अशा लुकमध्ये कियारा पोहोचली. यात ती खूपच सुंदर दिसत होती. मात्र नेटकऱ्यांचे लक्ष तिच्या हातांकडे गेले. तिच्या बोटात ना वेडिंग रिंग दिसली ना गळ्यात मंगळसूत्र. झालं तर मग नेटकऱ्यांनी यावरुन तिला ट्रोल करायला सुरुवात केली.
Their first award show appearance together 😭🥺🫶
— ˢ ᶦ ᵈ ᵏ ᶦ ᵃ ʳ ᵃ❤️ (@tishai1505) February 25, 2023
It feels so personal like I imagined this happening a long time ago and couldn't even express how happy I feel seeing them together...
Sid cheering for Kiara as a husband 🥺❤️
PROTECT🧿#SidKiara#SidharthMalhotra#KiaraAdvanipic.twitter.com/3sQ8jy9fQ4
सिड कियाराच्या या व्हिडिओवर चाहत्यांना बऱ्याच कमेंट्स केल्या आहेत. 'अनेक लोक तुमचे चाहते आहेत ते तुम्हाला फॉलो करतात. जर तुम्हीच परंपरेचे पालन केले नाही तर येणाऱ्या काळात याला कोणतंच महत्व राहणार नाही' अशी कमेंट एकाने केली आहे. याबाबत विचार करा असेही त्याने स्पष्ट सांगितले आहे. त्यात दोघेही वेगवेगळे का पोहोचले असाही प्रश्न चाहत्यांना पडला आहे.