Vodeo : मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या मुलीचं अस्खलित इंग्रजी ऐकूण थक्क झाले अनुपम खेर, घेतला असा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2021 05:04 PM2021-11-02T17:04:04+5:302021-11-02T17:04:43+5:30

अनुपम खेर नुकतेच काठमांडूला गेले होते. तेथे त्यांची भेट एका मुलीशी झाली. ही मुलगी भीक मागून जगते. मात्र, तीचे इंग्रजी सुंदर आहे. ही मुलगी सांगते, की तिची शिकायची इच्छा आहे आणि यावर अनुपम खेर तिला शिकविण्याचे आश्वासन देतात.

Kid was begging to actor Anupam Kher he took this decision to sponsor her study | Vodeo : मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या मुलीचं अस्खलित इंग्रजी ऐकूण थक्क झाले अनुपम खेर, घेतला असा निर्णय!

Vodeo : मंदिराबाहेर भीक मागणाऱ्या मुलीचं अस्खलित इंग्रजी ऐकूण थक्क झाले अनुपम खेर, घेतला असा निर्णय!

googlenewsNext

नवी दिल्ली - अनुपम खेर एक असे अभिनेते आहेत, जे सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. खेर यांनी नुकताच एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे, हा व्हिडिओ पाहून चाहते त्याचे प्रचंड कौतुक करत आहेत. या व्हिडिओमध्ये एक मुलगी खेर यांना प्रचंड विनंती करत आहे आणि यानंतर ते तिचे स्वप्न पूर्ण करण्याचे तिला आश्वासन देत आहेत.

अनुपम खेर यांना नेपाळमध्ये भेटली ही मुलगी -
अनुपम खेर नुकतेच काठमांडूला गेले होते. तेथे त्यांची भेट एका मुलीशी झाली. ही मुलगी भीक मागून जगते. मात्र, तीचे इंग्रजी सुंदर आहे. ही मुलगी सांगते, की तिची शिकायची इच्छा आहे आणि यावर अनुपम खेर तिला शिकविण्याचे आश्वासन देतात.

मुलीचे इंग्रजी ऐकून थक्क झाला अनुपम...!
हा व्हिडिओ शेअर करत अनुपम खेर यांनी लिहिले, 'मी काठमांडूच्या मंदिराबाहेर आरतीला भेटलो. ती मूळची राजस्थान, भारतातील आहे. तिने माझ्याकडे काही पैसे मागितले आणि माझ्यासोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर, ती माझ्याशी अस्खलितपणे इंग्रजीत बोलू लागली. तिची शिकण्याची इच्छा पाहून मला आश्चर्य वाटले. असा होता आमचा संवाद. अनुपम खेर फाउंडेशनने तिला शिकविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

भारत सोडून नेपाळमध्ये पोहोचली मुलगी -
या व्हिडिओमध्ये मुलगी म्हणते, 'माझे नाव आरती आहे आणि मी तुम्हाला भेटून अत्यंत उत्साही आहे. खूप खूप धन्यवाद. मी राजस्थान, भारतातील आहे. तिचे बोलणे ऐकून अनुपम खेर तिचे कौतुक करत, खूप छान इंग्रजी बोलतेस, असे म्हणाले. यावेळी ती एवढी छान इंग्रजी कशी बोलते? असेही अनुपम खेर यांनी विचारले. 

'गरिबीमुळे मागावी लागते भीक -
आरती म्हणते - मी भीक मागते. मी शाळेत जात नाही. भीक मागता-मागता मी थोडे-थोडे इंग्रजी शिकत राहिले आणि आता मी पूर्ण शिकले आहे. अनुपम यांनी विचारले- भिक का मागते? तू काही काम करायला हवे. यावर आरती म्हणते – मी गरीब कुटुंबातील असल्यामुळे मला भीक मागावी लागते. तेव्हा अनुपम म्हणतात - तू चांगले इंग्रजी बोलतेस, तुला कुणीही काम देईल. यावर आरती म्हणते- कुणीही काम देत नाही. ते म्हणतात, तू भारती आहेस, येथे कशासाठी आली. 

शाळेत पाठविण्याचे दिले आश्वासन -
अनुपम खेर विचारतात, की तू भारतातून इथे का आलीस? आरती सांगते - कारण भारतातही हीच समस्या आहे, पण इथे थोडं बरं आहे. अनुपम यांनी विचारले, की तू भारतात कुठल्या शाळेत गेली होती? यावर तिने सांगितले, की मी कोणत्याही शाळेत गेले नाही. आरती म्हणते – मी कोणत्याही शाळेत गेले नाही, पण मला शाळेत जायला आवडते, मला शाळेत जायचे आहे, कृपया मला मदत करा जेणेकरून मी शाळेत जाऊ शकेन. ती म्हणते- जर मी शाळेत गेले तर माझे भविष्य बदलेल, मी नेहमी लोकांना शाळेत जाण्यासाठी मदत करा, अशी विनंती करते. पण मला कुणीही मदत केली नाही.

मुलीच्या शिक्षणाची घेतली जबाबदारी -
यानंतर, अनुपम तिच्याकडून तिचा फोन नंबर घेतात आणि तिला शाळेत पाठविण्याचे आश्वासन देतात. अनुपम यांचे शब्द ऐकूण आरती खूश होते आणि मला माहीत आहे, की शिकले, तर माझे आयुष्य, माझे भविष्य सर्व काही बदलून जाईल, असे म्हणते. 
 

 

Read in English

Web Title: Kid was begging to actor Anupam Kher he took this decision to sponsor her study

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.