हर्षवर्धन राणे आणि किम शर्माचे ब्रेकअप, मॅनेजरने केला 'हा' मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 01:25 PM2019-04-23T13:25:51+5:302019-04-23T13:28:31+5:30
गेल्या काही दिवसांपासून किम शर्मा आणि हर्षवर्धन राणे यांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियावर दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्यावर या चर्चांनी अजून जोर पकडला.
गेल्या काही दिवसांपासून किम शर्मा आणि हर्षवर्धन राणे यांचे ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियावर दोघांनी एकमेकांना अनफॉलो केल्यावर या चर्चांनी अजून जोर पकडला. कारण या दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना सोबतच्या नात्याची कबुली दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार दोघांनी एकमेकांशी बोलणंदेखील बंद केले आहे. बॉलिवूड बबलच्या रिपोर्टनुसार हर्षवर्धनच्या मॅनेजरने आता हर्षवर्धन आणि किम एकत्र नसल्याचे सांगितले आहे. या गोष्टीमुळे दोघांचे फॅन्स नक्कीच नाराज होऊ शकतात.
हर्षवर्धन व किमच्या ब्रेकअपचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. मुंबईच्या रस्त्यांवरच्या बाईक राईडपासून हॉलिडेपर्यंत प्रत्येक ठिकाणी हे कपल एकत्र दिसू लागले होते. मात्र त्यांचे हे नातं फार दिवस तग धरु शकले नाही.
‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून हर्षवर्धनने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटातील त्याच्या कामाचे बरेच कौतुक झाले होते. यानंतर ‘पलटन’ या चित्रपटात तो झळकला. अर्थात बॉलिवूडमध्ये त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही.
किम शर्मा बद्दल सांगायचे तर ती कधीच बॉलिवूडमधून बाद झाली आहे. मोहोब्बतें, नहले पे दहला, मनी है तो हनी है, कुडियों का है जमाना यांसारख्या चित्रपटांमध्ये किम झळकली आणि अचानक बॉलिवूडमधून दिसेनासी झाली. अर्थात हर्षवर्धनसोबतच्या अफेअरमुळे ती पुन्हा चर्चेत आली होती. काही दिवसांपूर्वी किमच्या मोलकरणीने तिच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. महिन्याभराचा पगार किमने रखडविल्याचा आरोप तिने केला होता..