ईशा गुप्ता प्रमाणेच एक हिट देऊन गायब झाली बॉलिवूडची ही अभिनेत्री, तिला ओळखणंही झालंय कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 08:00 PM2019-12-01T20:00:00+5:302019-12-01T20:00:00+5:30
9 वर्षांपासून ही अभिनेत्री बॉलिवूडपासून दूर आहे.
ईशा गुप्ता आपल्या पहिल्याच सिनेमानंतर घराघरात पोहोचली होती. ईशाने महेश भट्ट यांच्या 'जन्नत 2' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. त्यानंतर तिचे अनेक सिनेमा फ्लॉप ठरले. इशाप्रमाणेच ‘मोहब्बतें’ सिनेमातून किम शर्माने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमा जबरदस्त हिट ठरला होता. किमने आपल्या फिल्मी करिअरमध्ये 18 चित्रपट केलेत. पण ‘मोहब्बतें’मधील तिची भूमिका सर्वाधिक लोकप्रिय झाली.
यशराजच्या चित्रपटातून डेब्यू करणारी किम 2008 मध्ये प्रदर्शित ‘मनी है तो हनी है’ या चित्रपटात अखेरची दिसली होती. यानंतर 2010 मध्ये ‘यगम’ या तेलगू चित्रपटात ती झळकली. पण तेव्हापासून तिच्याकडे एकही सिनेमा नाही. ‘मोहब्बतें’ फेम किम शर्मा दीर्घकाळापासून चित्रपटांपासून दूर आहे.
मध्यंतरी किम तिच्या लव्हलाईफमुळे चर्चेत होती. अभिनेता हर्षवर्धन राणेसोबतचे तिचे अफेअर चांगलेच गाजले होते. पण हे अफेअर फार काळ टिकले नाही. दोघांचे ब्रेकअप झाले. हर्षवर्धन याच्याआधी किमचे नाव अनेक व्यक्तींशी जोडले गेले.
सर्वप्रथम क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत तिच्या अफेअरची चर्चा झाली. यानंतर स्पॅनिश बॉयफ्रेन्ड कार्लोस मार्टिनला तिने डेट केले. कार्लोस व किम दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र यानंतर काय झाले हे कुणालाच कळले नाही. अचानक किमने अली पुंजानीसोबत लग्न केले. केवळ एक आठवड्याच्या डेटींगनंतर किम आणि अली यांनी २०१० मध्ये लग्न केले होते. यानंतर किमने मुंबईसोडून केन्याला तिच्या पतीसोबत राहायला गेली होती़ पण 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला होता.