बॉलिवूड संगीताचा बादशाह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2016 06:12 PM2016-12-25T18:12:38+5:302016-12-25T18:12:38+5:30

बॉलिवूड चित्रपटाचे लोकप्रिय संगीतकार नौशाद अली, यांचा २५ डिसेंबर हा जन्मदिवस. तब्बल ६४ वर्षे चित्रपटाला संगीत देण्याचे महान काम ...

King of Bollywood music | बॉलिवूड संगीताचा बादशाह

बॉलिवूड संगीताचा बादशाह

googlenewsNext
लिवूड चित्रपटाचे लोकप्रिय संगीतकार नौशाद अली, यांचा २५ डिसेंबर हा जन्मदिवस. तब्बल ६४ वर्षे चित्रपटाला संगीत देण्याचे महान काम नौशाद यांनी केले. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी आजही लोकप्रिय आहेत. चित्रपट संगीतात त्यांनी महत्वाचे योगदान दिले. त्यांची अनेक गाणी आजही दर्शकांच्या मनात रुंजी घालतात. शास्त्रीय संगीताला बॉलिवूडमध्ये मानाचे स्थान मिळवून देण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली. ते शायर, लेखक आणि निर्मातेही होते. इतकी वर्षे संगीत क्षेत्रात असतानाही त्यांनी केवळ ६४ चित्रपटांना संगीत दिले.


लखनौ येथील मुंशी वाहिद अली यांच्या घरी २५ डिसेंबर १९१९ मध्ये त्यांचा जन्म झाला. 
लखनौपासून जवळ असलेल्या बाराबंकी येथे भारतामधील श्रेष्ठ कव्वाल आणि गायकांना ऐकल्यानंतर त्यांना हिंदुस्तानी संगीतामध्ये रुची निर्माण झाली.
उस्ताद मुश्ताक हुसैन खान, उस्ताद झंडे खान, पं. खेमचंद्र प्रकाश यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगीताचे धडे गिरविले.
उत्तर प्रदेशहून मुंबई येथे आल्यानंतर त्यांनी उस्ताद झंडे खान यांच्याकडे ४० रुपये पगारावर काम करण्यास सुरूवात केली. नौशाद हे पियानो वाजवित होते. उस्ताद मुश्ताक हुसैन यांच्या आॅर्केस्ट्रामध्ये त्यांनी काम करण्यास प्रारंभ केला.
१९४० साली त्यांनी प्रेमनगर या चित्रपटाला संगीत दिले. १९४४ साली प्रदर्शित झालेल्या ‘रतन’ या चित्रपटातील संगीताने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
अंदाज, आन, अनमोल घडी, बैजू बावरा, मदर इंडिया, पाकिजा, अमर, स्टेशन मास्तर, शारदा, कोहिनूर, उडन खटोला, दिवाना, दिल्लगी, दर्द, दास्तान, शबाब, मुगल-ए-आजम, बाबुल, शहाजहान, दुलारी, लीडर, संघर्ष, मेरे मेहबूब, दिल दिया दर्द लिया, राम और श्याम, गंगा जमना, आदमी, गंवार, साथी, पालकी, आईना, पाकिजा, सन आॅफ इंडिया, लव्ह अँड गॉड या चित्रपटाला त्यांनी संगीत दिले.
शकील बदायुनी, मजरुह सुलतानपुरी, डी. एन. मुधोक, झिया सरहदी, खुमार बाराबंकी यांच्या शब्दरचना त्यांनी संगीतबद्ध केल्या.
अनेक नामवंत शास्त्रीय गायकांनी त्यांच्यासाठी गाणी म्हटली. आमिर खान आणि दत्तात्रय पलुस्कर यांनी बैजू बावरा (१९५२), बडे गुलाम अली खाँ यांनी मुगल-ए-आजम (१९६०), बैजू बावरा (१९५२) गाणी म्हटली. 
पाश्चात्य संगीताचा आपल्या संगीतासाठी वापर करणारे ते पहिले संगीतकार होते. एकाच वेळी १०० जणांचा त्यांचा आॅर्केस्ट्रा होता. मुगल-ए-आजम चित्रपटातील ऐ मुहब्बत झिंदाबाद या गाण्यासाठी त्यांनी १०० जणांचा कोरस वापरला.
नौशाद यांनी ‘प्यार किया तो डरना क्या’ या गाण्यासाठी लता मंगेशकर यांची बाथरुममध्ये तयारी केली. नंतर इको इफेक्टसह त्याचे रेकॉर्डिंग केले.
५ मे २००६ साली त्यांचे निधन झाले.


Web Title: King of Bollywood music

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.