किंग खान अबरामची मुंबईच्या रस्त्यावर लॉग ड्राइव्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2017 12:31 PM2017-02-21T12:31:03+5:302017-02-21T18:04:20+5:30

बॉलिवुडचा किंग खान याने आपला मुलगा अबराम याची नुकतीच एक इच्छा पूर्ण केली आहे. झाले असे की,  शाहरुख खान ...

King Khan Abiram's log drive on Mumbai's road | किंग खान अबरामची मुंबईच्या रस्त्यावर लॉग ड्राइव्ह

किंग खान अबरामची मुंबईच्या रस्त्यावर लॉग ड्राइव्ह

googlenewsNext
लिवुडचा किंग खान याने आपला मुलगा अबराम याची नुकतीच एक इच्छा पूर्ण केली आहे. झाले असे की,  शाहरुख खान याचा सर्वात लहान मुलगा अबराम खान याने राइडवर जाण्याची इच्छा व्यक्त केली. मग काय, बॉलिवुडच्या या बादशाहने त्वरीतच आपल्या या चिरंजीवाची ही इच्छा पूर्ण केली आहे. या 
या पिता-पुत्राने वांद्रे येथील कार्टर रोडवर येथे ओपन-टॉप कारने फेरफटका मारला. काही दिवसांपूर्वीच शाहरुखचा रईस चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतर आता त्याने आपल्या कामाला थोडा आराम दिला आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या लेकाला शाहरुख कनव्हर्टिबल कारमधून फेरफटका मारण्यासाठी घेऊन गेला होता. यावेळी आपल्या वडिलांच्या प्रसिद्धीने अनभिज्ञ असलेला अबरम मुंबईच्या हवेचा आनंद घेताना दिसला. त्याच्यासाठी हा अनुभव नवीन होता. मात्र, त्याचवेळी शाहरुखचे चाहते भर दिवसा त्याला गर्दीच्या ठिकाणी गाडी चालवताना पाहून चकित झाले होते.  त्यांचा हा फेरफटका सोशलमीडियावर मात्र हीट झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच्या या व्हिडीओ सोशलमीडियावर प्रचंड प्रमाणात पसंती मिळाली आहे. बहुतेक कलाकार मंडळी आपल्या मुलांना लाइमलाइटपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. पण, शाहरुख आपल्या लाडक्या लेकासोबत सार्वजनिक ठिकाणी  बिनधास्तपणे दिसत असतो. पिता पुत्राची ही जोडी बॉलिवुडसहित प्रेक्षकांच्या ही पसंतीस उतरली आहे. शाहरूखने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. त्यामुळे त्याचा चाहतावर्गदेखील मोठया प्रमाणात आहे. त्याचे प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्साहित असतात. त्यामुळे किंग खानच्या चाहत्यांसाठी त्याची ही ओपन कारची ड्राइव्ह नक्कीच सरप्राईज ठरली असणार. 








 

Web Title: King Khan Abiram's log drive on Mumbai's road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.