बॉयफ्रेंडने फसवणूक केल्यास काय करशील? किंग खानची लेक सुहाना म्हणाली…
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 12:07 PM2023-08-30T12:07:24+5:302023-08-30T12:14:19+5:30
सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिचा ‘द आर्चीज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान ही तिच्या स्टाईल आणि ड्रेसिंग सेन्समुळे चर्चेत असते. सुहाना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तिचा ‘द आर्चीज’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुहाना यात वेरोनिका लॉज नावाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सुहाना तिच्या आगामी सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सुहाना हिला एक प्रश्न विचारण्यात आला, ‘जर सुहाना हिच्या बॉयफ्रेंडला दुसऱ्या मुली आवडत असतील तर तू काय करशील?’ त्यावर सुहानाने सिनेमातील वेरोनिकाच्या भूमिकेच्या दृष्टिकोनातून उत्तर दिलं. "वेरोनिकाला अप्रोच करणाऱ्या मुलांची लिस्ट फार मोठी आहे. ती देखील दुसऱ्या मुलांसोबत बोलू शकते. पण, जर खऱ्या आयुष्यात असे झाले तर तर मी त्याला सोडून देईल. ‘वन वुमन मॅन’ विचारांचे पुरुष मला आवडतात. अनेक मुलींसोबत रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या मुलासोबतचे नाते मी पुढे नेणार नाही". सध्या सर्वत्र सुहानाने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगत आहे.
'द आर्चीज' हा सिनेमा 7 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज होणार आहे. हा सिनेमा अमेरिकन लोकप्रिय कॉमिक्स 'द आर्चीज'वर आधारित असून 1960 च्या काळावर भाष्य करणारा आहे. मैत्री,फ्रिडम, प्रेम आणि हार्ट ब्रेक हे सर्व 'द आर्चीज' या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे.
सुहाना ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. तिला इन्स्टाग्रामवर चार मिलियन फॉलोवर्स आहेत. सुहाना तिच्या विविध लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. सुहानाच्या फोटोवर नेटकरी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.