किंग शाहरूख खानला ‘या’ वाईट सवयीपासून हवी मुक्ती; काही प्रमाणात मिळाले यश!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 12:39 PM2017-12-29T12:39:29+5:302017-12-29T18:09:29+5:30

बॉलिवूडमध्ये ‘किंग’ या नावाने ओळखला जाणारा अभिनेता शाहरूख खान सध्या एका वाईट सवयीमुळे चांगलाच त्रस्त आहे. त्याला या सवयीपासून ...

King Shah Rukh Khan wants freedom from 'bad habits'; Found some success! | किंग शाहरूख खानला ‘या’ वाईट सवयीपासून हवी मुक्ती; काही प्रमाणात मिळाले यश!

किंग शाहरूख खानला ‘या’ वाईट सवयीपासून हवी मुक्ती; काही प्रमाणात मिळाले यश!

googlenewsNext
लिवूडमध्ये ‘किंग’ या नावाने ओळखला जाणारा अभिनेता शाहरूख खान सध्या एका वाईट सवयीमुळे चांगलाच त्रस्त आहे. त्याला या सवयीपासून मुक्ती हवी आहे. काही प्रमाणात तो यात यशस्वीही झाला आहे, परंतु त्याची धडपड अजूनही सुरूच आहे. डेक्कन क्रॉनिकलशी चर्चा करताना त्याने सांगितले की, मी सिगारेट ओढणे कमी केले आहे. कारण माझ्या या सवयीमुळे मी बºयाचदा टीकेचा धनी ठरलो आहे. ऐवढेच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यामुळे मला दंडही भरावा लागला आहे. त्यामुळे मला आता या वाईट सवयीपासून मुक्ती हवी आहे. आता शाहरूख ही सवय सोडण्यात कितपत यशस्वी ठरतो हे येत्या काळात स्पष्ट होईलच. 

दरम्यान, शाहरूख सध्या आनंद एल. राय यांच्या आगामी चित्रपटात काम करीत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा बघावयास मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या एका इव्हेंटमध्ये शाहरूखला विचारण्यात आले होते की, ‘यावर्षी तू कोणकोणते चित्रपट बघितले आहेत?’ त्यावर शाहरूखने म्हटले होते, ‘लिपस्टिक अंडर माय बुरका’ हा चित्रपट बघितला. त्याचबरोबर आनंद सर यांचा ‘शुभ मंगल सावधान’ बघितला. ‘दंगल’ मी याच वर्षी बघितला. ‘एक था टायगर’ आताच बघितला, सॉरी ‘टायगर जिंदा हैं’ असे मला म्हणायचे होते. तसेच ‘बरेली की बरफी’ हा चित्रपटही बघितला. आता चित्रपटच बघत राहिलो तर काम कधी करू? असेही शाहरूखने यावेळी म्हटले होते. 



यावेळी शाहरूखने सलमानला बर्थ डे विशदेखील केले होते. शाहरूख ‘जियो’च्या एका इव्हेंटमध्ये उपस्थित होता. यावेळी त्याने ‘जियो’चे प्रमोशनही केले. तसेच ‘जियो’चा संदर्भ जोडताना त्याने सलमानला बर्थ डे विश केले. त्याने ‘तुम जियो हजारों साल, साल के दिन हो ५० हजार’ हे गाणे म्हटले. 

Web Title: King Shah Rukh Khan wants freedom from 'bad habits'; Found some success!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.