सावत्र लेकीच्या वेडिंग रिसेप्शनला आमिरची Ex पत्नी किरण रावची दांडी! समोर आलं मोठं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2024 03:44 PM2024-01-14T15:44:20+5:302024-01-14T15:44:58+5:30
आयरा-नुपूरच्या वेडिंग रिसेप्शनला किरण राव का आली नाही? आमिर खानने सांगितलं खरं कारण
बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक आयरा खान नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. मुंबईत कोर्ट मॅरेज केल्यानंतर आयरा आणि नुपूरने उदयपूरमध्ये ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं. त्यानंतर आयरा आणि नुपूरचं वेडिंग रिसेप्शन शनिवारी(१३ जानेवारी) मुंबईत पार पडलं. आयरा-नुपूरच्या वेडिंग रिसेप्शनला सिनेजगतातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. बॉलिवूडसह मराठी सिनेसृष्टीतील सितारेही आयरा-नुपूरच्या रिसेप्शन पार्टीत दिसून आले. तर राजकीय नेत्यांनीही रिसेप्शनला हजेरी लावत नव्या जोडप्याला शुभेच्छा दिल्या. पण, आयराच्या वेडिंग रिसेप्शनला किरण राव गैरहजर होती.
आमिरची दुसरी पत्नी किरण राव आयराच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये दिसली नाही. याआधी आयराच्या लग्नातील सगळ्या कार्यक्रमांना ती उपस्थित होती. संगीत सोहळ्यात तिने आयरासाठी गाणंही गायलं होतं. पण, लग्नाच्या वेडिंग रिसेप्शनमधील फॅमिली फोटोत किरण राव दिसली नाही. त्यामुळे सावत्र लेकीच्या लग्नाच्या रिसेप्शनला किरण राव का आली नाही? याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर आता यामागचं कारण समोर आलं आहे. खुद्द आमिर खाननेच किरण राव का आली नाही, याबाबत माहिती दिली आहे.
आयरा-नुपूरच्या लग्नात आमिर खान, त्याची पहिली पत्नी रिना दत्ता, लेक जुनैद आणि आझादही उपस्थित होते. पण, किरण राव न दिसल्याने चाहत्यांना प्रश्न पडला होता. पापाराझींना फोटो काढताना आमिरने याचं उत्तर दिलं. "किरणची तब्येत ठिक नसल्यामुळे ती आज आली नाही", असं आमिर म्हणाला. दरम्यान, आयरा-नुपूरच्या वेडिंग रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आमिरचा जावई नुपूर एक फिटनेस ट्रेनर आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसह तो आमिर खानचाही फिटनेस ट्रेनर राहिलेला आहे. आयरा आणि नुपूर गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. मे महिन्यात त्यांचा साखरपुडा झाला होता. आता लग्नबंधनात अडकून त्यांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.