लोकप्रिय होऊनही 'लापता लेडीज' ला अपयशी सिनेमा का म्हणते किरण राव? 'हे' ठरलं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 03:57 PM2024-07-23T15:57:48+5:302024-07-23T15:58:30+5:30

किरण रावने व्यक्त केलं दु:ख

kiran Rao revealed why she considered Laapata Ladies as a failure | लोकप्रिय होऊनही 'लापता लेडीज' ला अपयशी सिनेमा का म्हणते किरण राव? 'हे' ठरलं कारण

लोकप्रिय होऊनही 'लापता लेडीज' ला अपयशी सिनेमा का म्हणते किरण राव? 'हे' ठरलं कारण

दिग्दर्शिका किरण रावचा (Kiran Rao)  'लापता लेडीज' (Laapata Ladies)  सिनेमा मार्च महिन्यात रिलीज झाला. कलाकारांचा अभिनय, सिनेमाची गोष्ट सगळंच जमून आलं. नवोदित कलाकारांनी अप्रतिम काम केलं. सिनेमाचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं. सिनेमातलं 'ओ सजनी रे' हे गाणं तर आजही गाजतंय. किरण रावने मात्र स्वत:चाच हा सिनेमा फ्लॉप असल्याचं वक्तव्य केलं.

'लापता लेडीज' सिनेमावर प्रतिक्रिया देताना किरण राव म्हणाली, "माझे दोन्ही सिनेमे धोबी घाट आणि लापता लेडीज बॉक्स ऑफिसवर फारसे कमाल करु शकले नाहीत. धोबी घाटने तरी थोडाफार बिझनेस केला. पण लापता लेडीज तेवढंही करु शकला नाही. त्यामुळे मला कुठे ना कुठे सिनेमाबाबत फेल्युअरची भावना वाटते. बॉक्सऑफिसच्या नजरेत आम्ही अयशस्वी ठरलो. आम्ही १०० च काय ३० कोटीही नाही कमावले. याला मी स्वत: जबाबदार आहे."

ती पुढे म्हणाली, "धोबी घाटच्या अपयशासाठी तर मी स्वत:ला आणखी जास्त जबाबदार समजते. कारण तेव्हा ओटीटी प्लॅटफॉर्म नव्हता. त्यामुळे जास्त प्रेक्षक मिळाले नाहीत. तो सिनेमा खरंच खूप वेगळा होता. हे अपयश मला रोजचंच वाटतंय. मी १० वर्षांपासून काम करत आहे. बरेच दिवस मी व्यस्त असते. पहिल्या सिनेमानंतर मी विचार केला की दुसरा सिनेमाही येईल. पण असं झालं नाही. मी जवळपास रोज काम करत होते. त्यामुळे मला वाटतं हे माझं रोजचं अपयश आहे. क्रिएटिव्ह लोकांनी जर वेळेत एखादी गोष्ट करु शकले नाहीत तर त्यांना अपयशाची भावना जाणवते."

'लापता लेडीज' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमा चांगलाच लोकप्रिय झाला. व्ह्यूजमध्ये सिनेमाने 'अॅनिमल'लाही मागे टाकले. अॅनिमलला नेटफ्लिक्सवर १३ मिलियन व्ह्यूज मिळाले तर लापता लेडीजला १४ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले.

Web Title: kiran Rao revealed why she considered Laapata Ladies as a failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.