लग्नानंतर किरण रावने गमावलं होतं तिचं बाळ; मिसकॅरेजविषयी बोलताना झाली भावुक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 03:32 PM2024-04-19T15:32:48+5:302024-04-19T15:33:21+5:30
Kiran rao: आझादच्या जन्मापूर्वी किरण राव प्रेग्नंट होती. मात्र, तिला तिचं बाळ गमवावं लागलं.
सिने- दिग्दर्शक, निर्माती किरण राव (Kiran Rao) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. यात तिच्या फिल्मी करिअरसोबतच पर्सनल आयुष्याचीही चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं. सध्या सोशल मीडियावर किरणची एक मुलाखत चर्चेत येत आहे. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या मिसकॅरेजविषयी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. आझादच्या जन्मापूर्वी किरणने तिचं एक बाळ गमावलं आहे.
किरणने २००५ मध्ये आमिर खानसोबत संसार थाटला.त्यानंतर २०११ मध्ये किरणने सरोगेसी पद्धतीने आझादला जन्म दिला. परंतु, आझादच्या जन्मापूर्वी किरण प्रेग्नंट होती मात्र, काही कारणास्तव तिला तिचं पहिलं बाळ गमवावं लागलं. झूमला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने याविषयी भाष्य केलं.
"धोबी घाट सिनेमा ज्या वर्षी रिलीज झाला त्याच वर्षी आझाद माझ्या आयुष्यात आला. मी बाळासाठी खूप प्रयत्न केले. लग्नानंतर पाच वर्षात माझं अनेकदा मिसकॅरेज झालं. मला अनेक शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागलं. त्यामुळे बाळाला जन्म देणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. पण, मला माझं बाळ हवं होतं. मला माझ्या बाळाचं संगोपन करायचं होतं", असं किरण राव म्हणाली.
दरम्यान, आझादच्या जन्मानंतर किरणने काही काळासाठी इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला. त्यानंतर तब्बल १० वर्षानंतर तिने लापता लेडीज या सिनेमातून इंडस्ट्रीत कमबॅक केलं.