आमिर खानने घटस्फोट दिल्यानंतर किरण रावची झाली अशी अवस्था, ओळखणंही झालं कठीण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 04:36 PM2021-10-01T16:36:32+5:302021-10-01T16:38:02+5:30
घटस्फोटानंतर आमिर खान आणि किरण राव एकत्र स्पॉट झाले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा आझादही होता.
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला. आमिर खान आणि किरण राव यांनी त्यांच्या चाहत्यांना व्हिडीओ शेअर करून सांगितले होते की, दोघेही त्यांच्या निर्णयावर खूश आहेत आणि अशात आता दोघांचे एकत्र फोटो समोर आले आहेत. जे प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच, घटस्फोटाच्या आदल्या दिवशीही दोघे एकत्र दिसले होते.
घटस्फोटानंतर आमिर खान आणि किरण राव एकत्र स्पॉट झाले. घटस्फोटानंतर त्या दोघांची एकत्र स्पॉट होण्याची ही पहिली वेळ नाही. दोघेही बऱ्याचदा त्यांचा मुलगा आझादसोबतही दिसले आहेत. ते दोघे मिळून त्यांच्या मुलाचे पालकत्व करत आहेत. दरम्यान आता आमिर आणि किरण जेवण करण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचले होते. दोघांनीही पापाराझीसमोर एकत्र पोज दिली. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यातील किरण रावचा लूक पाहून लोक तिला ट्रोल करत आहेत.
किरणने सैल शर्ट आणि पँट घातली आहे. तिचे केस पूर्णपणे पांढरे झालेले दिसतात. तिचा हा लूक पाहून चाहते तिच्या प्रकृतीबद्दल बोलत आहे. एका युजरने म्हटले की, काय झाले आहे, नेमकं ? तर दुसऱ्याने लिहिले की घटस्फोटानंतर ती आता म्हातारी झाली आहे. यासोबत अनेकांनी त्या दोघांच्या नात्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आणखी एका युजरने असे लिहिले की त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते, पण मग घटस्फोट झाला का ? तसेच घटस्फोटानंतरही ते एकत्र का आहेत? असेही सवाल केले आहेत. किरणला या अवस्थेत पाहून अनेकांना तिला ओळखताही आले नाही.
घटस्फोट झाला असला तरी आमिर खान आणि किरण राव अजूनही एकत्र काम करत आहेत. दोघेही लडाखमध्ये एकत्र दिसले होते. दोघांचा डान्स व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता. गेल्या महिन्यात दोघेही ‘लाल सिंह चड्ढा’च्या शूटिंगनंतर लडाखहून परतले.
एक व्हिडीओ शेअर करून दोघांनी सांगितले की ते व्यावसायिकपणे एकत्र काम करतील. तसेच, मुलाचे सह-पालकत्व करतील. दोघेही म्हणतात की शेवट म्हणून पाहण्याऐवजी आम्ही याला एक नवीन सुरुवात म्हणून पाहत आहोत.