शेफाली शाहसोबत किसींग सीनबाबत बोलली कीर्ती कुल्हारी, 'मला भीती होती जर मी टर्न ऑन झाले तर?'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 02:03 PM2022-01-15T14:03:41+5:302022-01-15T14:04:27+5:30
Human Series Kissing Scene : सीरिजमध्ये दाखवलं आहे की, कशाप्रकारे नवी औषधं बाजारात आणण्याआधी मनुष्यांवर प्रयोग केली जातात. कशाप्रकारे औषधांच्या ट्रायलमध्ये भाग घेणारे लोक कंपन्या आणि डॉक्टरांसाठी नोट छापणारी मशीन बनत आहेत.
डिज्ने हॉटस्टारवर रिलीज झालेली वेब सीरिज ह्यूमन (Human Series) सध्या चर्चेत आहे. या सीरिजमध्ये शेफाली शाह (Shaifali Shah) आणि कीर्ती कुल्हारी (Kirti kulhari) मुख्य भूमिकेत आहे. सीरिजमध्ये दाखवलं आहे की, कशाप्रकारे नवी औषधं बाजारात आणण्याआधी मनुष्यांवर प्रयोग केली जातात. कशाप्रकारे औषधांच्या ट्रायलमध्ये भाग घेणारे लोक कंपन्या आणि डॉक्टरांसाठी नोट छापणारी मशीन बनत आहेत. कीर्ती कुल्हारी आणि शेफाली शाहने यात डॉक्टरची भूमिका साकारली आहे. दोघींमध्ये किसींग सीनही दाखवले आहे. याबाबत कीर्तीने आपला अनुभव शेअर केला.
किसचा विचित्र अनुभव
कीर्ती कुल्हारीसाठी स्क्रीनवर एका महिलेला किस करणं सोपं नव्हतं. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितलं की, एका महिलेसोबत ती केमिस्ट्री बनवण्याचा प्रयत्न करण्याबाबतही विचार करणं अजब होतं. हा सीन शूट करताना तिच्या मनात अनेक विचित्र विचार येत होते.
कीर्तीने सांगितलं की, 'निश्चितपणे मी एक अभिनेत्री आहे. मी यासाठी तयार आहे. पण तरीही हा अनुभव माझ्यासाठी अजब होता. कारण मी आधी कधीही असं केलं नव्हतं. हे माझ्यासाठी अजूनही अजब आहे कारण की, एका महिलेसोबत केमिस्ट्री बनवताना तसे एक्सप्रेशन देणं, जसे मुलांसाठी रिअल असतात, ते वेगळं आहे'.
भीती होती की, मी टर्न ऑन झाले तर ?
ह्यूमनमधील किसींग सीन शूटबाबत अभिनेत्री म्हणाली की, 'मला वाटतं की, किसींग सीनसाठी सर्वात जास्त नर्वस माझे दिग्दर्शक मोजेज सिंह होते. मी फक्त विचार करत होते की काय होईल? जर किसींग सीन करताना मला काही फील झालं, किंवा जर मी टर्न ऑन झाले? मग मी बसून हा विचार करायला लागेल की, मलाही महिलांमध्ये इंटरेस्ट आहे का? आम्ही रिहर्सल केली नव्हती. दिग्दर्शकाने किसचे वेगवेगळ्या अॅंगलने ८ ते १० टेक घेतले'.