Kishore Kumar Birth Anniversary : गायक किशोर कुमार यांनी गायलेली मराठी गाणी ऐकलीत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 09:09 IST2018-08-03T16:55:12+5:302018-08-04T09:09:44+5:30
Kishore Kumar Birth Anniversary : गायक, अभिनेते, दिग्दर्शक असं बहुरंगी व्यक्तीमत्व म्हणजे लोकप्रिय गायक किशोर कुमार. किशोर कुमार यांचा आज वाढदिवस.

Kishore Kumar Birth Anniversary : गायक किशोर कुमार यांनी गायलेली मराठी गाणी ऐकलीत का?
Kishore Kumar Birth Anniversary : गायक, अभिनेते, दिग्दर्शक असं बहुरंगी व्यक्तिमत्व म्हणजे लोकप्रिय गायक किशोर कुमार.किशोर कुमार यांचा आज वाढदिवस. वेगवेगळ्या भाषेतील श्रोत्यांना आपल्या आवाजाने भुरळ पाडणारे किशोर कुमार यांनी मराठी भाषेतही काही गाणी गायली आहेत.
सचिन पिळगांवकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गंमत जंमत’ या सिनेमातील ‘अश्विनी ये ना’ हे गाणं किशोर कुमार यांनी गायलं आहे. मामा म्हणजे अशोक सराफ यांच्यावर आणि चारूशिला साबळे यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं आहे. आजही हे गाणं आवडीने ऐकलं जातं. अरूण पौडवाल यांनी हे गाणं कंपोज केलं होतं.
किशोर कुमार यांनी गायलेलं दुसरं मराठी गाणं सुद्धा हे सचिन पिळगांवकर यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘तुझी माझी जोडी जमली’ या सिनेमातील आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे हे गाणं सुद्धा अभिनेते अशोक सराफ यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. तर अरूण पौडवाल यांनी हे गाणं कंपोज केलंय.
किशोर कुमार आणि सचिन पिळगांवकर यांनी अनेक सिनेमांमध्ये एकत्र कामे केली आहे. सचिन यांनीच किशोर कुमार यांना या दोन्ही सिनेमात अशोक सराफ यांना आवाज देण्यासाठी किशोर कुमार यांना गाण्यास तयार केले होते. या दोन्ही गाण्यांमुळेही अशोक सराफ यांना स्टार बनण्यात मोठी मदत झाली आहे.
किशोर कुमार यांचं आणखी एक मराठी कनेक्शन सांगायचं तर किशोर कुमार यांची चौथी पत्नी लिना चंदावरकर या महाराष्ट्रीयन आहेत. अनेक हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी काम केले असून लिनापासून किशोर कुमार यांना सुमित कुमार हा मुलगाही झाला आहे.