KKBKKJ: १४ दिवसांनी अखेर 'किसी का भाई किसी की जान' ने जमवला १०० कोटींचा गल्ला; जाणून घ्या एकूण कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 09:52 AM2023-05-06T09:52:59+5:302023-05-06T09:59:14+5:30

'किसी का भाई किसी की जान' बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा गल्ला जमावताना बरीच दमछाक झाली.

kisi ka bhai kisi ki jaan salman khan film crossed 100 crores net in indian box office after 14 days of release | KKBKKJ: १४ दिवसांनी अखेर 'किसी का भाई किसी की जान' ने जमवला १०० कोटींचा गल्ला; जाणून घ्या एकूण कमाई

KKBKKJ: १४ दिवसांनी अखेर 'किसी का भाई किसी की जान' ने जमवला १०० कोटींचा गल्ला; जाणून घ्या एकूण कमाई

googlenewsNext

सलमान खान स्टारर मोस्ट अवेटेड चित्रपट 'किसी का भाई किसी की जान' ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. भाईजानच्या या चित्रपटाने अखेर 14 दिवसांनंतर भारतीय बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नाही, मात्र ईदच्या सुट्ट्यांमुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी 'किसी का भाई किसी की जान'ची कमाई वाढली आणि चांगले कलेक्शनही केले. पण त्यानंतर चित्रपटाच्या कमाईत घट झाली. 

 2 आठवड्यांनंतर, केवळ 100 कोटींहून अधिक कमाईसह, चित्रपट सुमारे 105 कोटींच्या कलेक्शनपर्यंत पोहोचले आहे. 'किसी का भाई किसी की जान' चे  बॉक्स ऑफिस नंबर सलमानच्या मागील ईद रिलीजच्या तुलनेत खूपच कमी आहेत.

पहिला आठवडा : 85.50 कोटी
आठवा दिवस : २.२५ कोटी
नववा दिवस : 3 कोटी रु
दहावा दिवस : 4 कोटी रुपये
अकरावा दिवस : 2.50 कोटी
बारा दिवस : 1.25 कोटी रु
तेरावा दिवस : 1.०५ कोटी
चौदावा दिवस : 90 लाख रु
एकूण कलेक्शन - रु 100.45 कोटी

सलमान खानचा चित्रपट 'किसी का भाई, किसी की जान' हा तमिळ चित्रपट वीरमचा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट 2014 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अजित कुमार आणि तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत होते. किसी की भाई, किसी की जानमध्ये तिने पहिल्यांदाच सलमान खानसोबत मुख्य भूमिका साकारली होती. या दोन स्टार्सशिवाय शहनाज गिल, पलक तिवारी, राघव जुयाल, जस्सी गिल आणि सिद्धार्थ आनंद तसेच साऊथ स्टार व्यंकटेश आणि जगपती बाबू हे देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Web Title: kisi ka bhai kisi ki jaan salman khan film crossed 100 crores net in indian box office after 14 days of release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.