'अजनबी'च्या सेटवर बॉबी देओलच्या पत्नीने लगावली होती करीनाच्या कानशिलात; वाचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 02:16 PM2023-12-05T14:16:17+5:302023-12-05T14:17:27+5:30
Kareena kapoor: करीनाने तान्या आणि बबिता यांच्या वादात उडी घेतली आणि सगळ्यांसमोर स्वत:चा अपमान करुन घेतला.
बॉलिवूडमध्ये करीना कपूर खान (Kareena Kapoor) हिचा चांगलाच दबदबा आहे. त्यामुळे तिच्याविषयी कायम नवनवीन किस्से रंगत असतात. सुपरहिट सिनेमांमुळे चर्चेत येणारी करीना बऱ्याचदा कॅटफाईटमुळे चर्चेत येत असते. करीनाचे कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींसोबत मतभेद आहेत. इतकंच नाही तर बऱ्याचदा तिने सेटवर वादविवादही केले आहेत. परंतु, एका सिनेमाच्या सेटवर चक्क करीनाला अभिनेता बॉबी देओल याच्या पत्नीकडून मार खावा लागला होता. बॉबीच्या पत्नीने सगळ्यांसमोर करीनाच्या कानशिलात लगावली होती.
पहिल्या सिनेमापासूनच हिट झालेल्या करीनाने सुरुवातीच्या काळात अनेक को-स्टार्ससोबत भांडणं केली होती. तिचे अनेक वाद सोशल मीडियावरही रंगले होते. यात अजनबी सिनेमाच्या सेटवर तिचं आणि बिपाशा बासूचं झालेलं भांडणं इंडस्ट्रीमध्ये प्रचंड गाजलं होतं. इतकंच नाही तर बिपाशासोबत भांडत असतानाच तिने बॉबी देओलच्या पत्नीसोबतही पंगा घेतला होता. या सेटवर तान्या देओल आणि करीनाचंही भांडण झालं होतं. त्यांच्यातील हा वाद आजही सोशल मीडियावर चर्चिला जातो. परंतु, तान्याने खरोखर करीनाच्या कानशिलात लगावली होती की नाही हे निश्चितपणे कोणीच सांगू शकत नाही. मात्र, त्यांच्यातील वाद आजही चर्चेत येतो.
नेमकं काय घडलं होतं करीना-तान्यामध्ये?
करीनाला सुरुवातीपासूनच बॉबीची पत्नी अर्थात तान्या देओल अजिबात आवडत नाही. त्यामुळे कुठेही या दोघी एकमेकींना दिसल्या की त्यांचा मार्ग बदलतात. विशेष म्हणजे त्यांच्यातील याच वादामुळे करीना आणि बॉबी देओल यांच्या मैत्रीतही फूट पडली. २००१ मध्ये रिलीज झालेल्या अजनबी या सिनेमात करीनाने बॉबी देओलच्या ऑन स्क्रीन पत्नीची भूमिका साकारली होती. त्यांच्यासोबतच या सिनेमात बिपाशा बासू आणि अक्षय कुमारदेखील या सिनेमात झळकले होते.
रिपोर्टनुसार, अजनबीच्या सेटवर तान्या, बिपाशाला तिच्या कॉस्ट्यूमसाठी मदत करत होती. जे पाहून करीनाची आई बबिता नाराज झाल्या. त्यामुळे त्यांनी तान्याला खरंखोटं सुनावलं. त्या इथवरच थांबल्या नाहीत त्यांनी सेटवर बॉबीलाही टार्गेट करायला सुरुवात केली. बबिता यांचं वागणं पाहून बॉबी दुर्लक्ष करत होता. मात्र, तान्याने हे खपवून घेतलं नाही. बबिता यांचं वागणं पाहून तान्यानेही त्यांना धडा शिकवायचं ठरवलं. ती सुद्धा सेटवर बबिता यांच्यांकडे दुर्लक्ष करु लागली, त्यांना टोमणे मारु लागली.
तान्या-बबिताच्या वादात करीनाची उडी
तान्या आपल्या आईसोबत ज्या पद्धतीने वागत होती हे पाहून करीना संतापली आणि तिने भांडायला सुरुवात केली. फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीमध्येही तिने, मला तान्याचा प्रॉब्लेम होता. ती माझ्या आईसोबत नीट वागत-बोलत नव्हती. त्यामुळे मला राग आला होता,असंही करीनाने थेट सांगितलं होतं.
करीनाने घेतला बॉबीसोबत बदला
इतक्या शुल्लक कारणामुळे बबिता नाराज का झाल्यात हे तान्याला कळतच नव्हतं. तान्याने बबिता यांना चांगलंच सुनावलं. याच वादविवादात करीनाने उडी घेतल्यामुळे तान्याने तिच्या कानशिलात लगावली होती असं म्हटलं जातं. या सेटवर दोघींनीही एकमेकांना अपशब्द वापरले होते. परंतु, करीनाने बऱ्याच वर्षांनंतर तिचा बदला पूर्ण केला. जब वी मेट या सिनेमात बॉबी देओल प्रथम मुख्य भूमिका साकारणार होता. मात्र, करीनाने त्याचा पत्ता कट केला. त्याच्या जागी तिने शाहिद कपूरला लीड रोलमध्ये घ्यायला सांगितलं.